Three arrested in Pune for demanding ransom in the name of Chandrakant Patil
Three arrested in Pune for demanding ransom in the name of Chandrakant Patil

चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांच्या हाती बेड्या 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा वापर करुन विविध क्षेत्रातील लोकांकडून देणगीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या तिघांना पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. संशयित तिघांविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवड येथील चार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा वापर करुन विविध क्षेत्रातील लोकांकडून देणगीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या तिघांना पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. संशयित तिघांविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवड येथील चार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

निगडी, कोथरुड, डेक्कन, अलंकार पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलिस ठाण्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार सौरभ अष्टुल (वय २७), किरण शिंदे (वय ३८), किरण कांबळे (वय ३०, तिघेही रा. लोहिया नगर, गंज पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील चौथा संशयित आरोपी विशाल शेंडगे (वय ३०, रा. गंज पेठ, पुणे) हा फरारी आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलत आहे, असे संशयित आरोपी सांगायचे. कोरोनाच्या कालावधीत भाजपच्या वतीने गोरगरीबांना मदत केली केली जात आहे. हे काम कायम सुरू ठेवण्यासाठी देणगीची गरज आहे, असे सांगून हे संशयित आरोपी डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना फोन करत होते. थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याच नावाने फोन केले जात असल्याने नागरीकही मदत करत होते. मात्र एका प्रकरणात त्यांनी देणगीसाठी दमदाटी केली. त्या वेळी संबंधीत व्यक्तीने शंका आल्याने थेट पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला, असे पोलिस उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

निगडी पोलिसांनी एका संशयित आरोपीला या प्रकरणी अटक केली होती. दुसऱ्या एकाला चौकशीसाठी बोलावले होते. कोथरूड पोलिस त्याचवेळी याच प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी दोघांना अटक केली. सुरेश कांबळे नावाचा याच घटनेतील एक आरोपी हा पुण्यातील गंज पेठेत राहात असल्याची खबर पोलिस कर्मचारी विजय कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यालाही पोलिसांना अटक केली.
 

आरोपी रिक्षाचालक, बेरोजगार, कंत्राटी कामगार

समाजातील नामांकित व्यक्तीची नावे घेऊन विशाल शेंडगे व सुरेश कांबळे हे दोघे २०१४ पासून नागरिकांना गंडा घालत होते. पैसे मिळू लागल्यानंतर या दोघांनी थेट आमदार-खासदारांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली होती. या संशयित आरोपींमध्ये किरण शिंदे हा रिक्षाचालक आहे, तर सौरभ अष्टलु व सुरेश कांबळे हे दोघे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करत होते. विशाल शेंडगे हा बेरोजगार होता. या चौघानी एकत्र येऊन लोकांची फसवणूक करण्याचे काम सुरु केले होते.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com