पोलिस अधीक्षक पाटील यांनी आवळल्या 12 वाळू माफियांच्या मुसक्‍या 

इंदापूर तालुक्‍यात वाळू उपशाच्या माध्यमातून हैदास घालून दशहत निर्माण करणाऱ्या दोन टोळीतील 12 वाळू माफियांच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुसक्‍या आवळल्या. या बारा जणांना पुणे आणि सोलापूर जिल्हातील पाच तालुक्‍यातून तडीपार करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी आवळल्या 12 वाळू माफियांच्या मुसक्‍या 
Tadipari action against sand mafia twelve people

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्‍यात वाळू उपशाच्या माध्यमातून हैदास घालून दशहत निर्माण करणाऱ्या दोन टोळीतील 12 वाळू माफियांच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुसक्‍या आवळल्या. या बारा जणांना पुणे आणि सोलापूर जिल्हातील पाच तालुक्‍यातून तडीपार करण्यात आले आहे. 

बबलू पवार याच्या टोळीतील तडीपार केलेल्यांची नावे : बबलू ऊर्फ सौरभ मनोहर पवार (वय 32), प्रीतम सुरेश जाधव (वय 32), सचिन अर्जुन गोसावी (वय 31), बापू ऊर्फ अनिकेत शिवाजी रणमोडे (वय 28), संदीप रामभाऊ गोसावी (वय 28), युनुसरहिम नसीद पठाण (वय 32, सर्वजण रा. रणगाव, ता. इंदापूर). 

महेश अर्जुन याच्या टोळीतील तडीपारांची नावे : महेश महादेव अर्जुन (वय 29, रा. चिखली), कुलदीप पोपट रकटे (वय 27, रा. रणगाव), पिंटु ऊर्फ दीपक औंदुबर उबाळे (वय 38, रा. वालचंदनगर), तेजस शिवाजी जाधव (वय 24, रा. कळंब), निखील हरी भोसले (वय 28, रा. लासुर्णे), सचिन शिवाजी अर्जुन (वय 37, रा. चिखली, ता. इंदापूर) 

वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील बबलू पवार (रा. रणगाव) व महेश अर्जुन (रा. चिखली) यांच्या टोळीवर ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. बबलू पवार याच्या टोळीने वालचंदनगर व इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गर्दी करुन मारामारी करणे, दरोडा टाकणे व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार केला होता. 

महेश अर्जुन याच्या टोळीने दहशत निर्माण करण्यासाठी व आर्थिक प्राप्तासाठी वाळू चोरी करणे, वाळू चोरी करण्यासाठी अडथळा आणणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, दरोडे टाकणे, चोरी करणे, शासकीय कामात अडथळा आणून टोळीची दहशत निर्माण केली होती. 

दोन्ही टोळीवर इंदापूर व वालचंदनगर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. बारा जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. बबलू पवार याच्या टोळीतील सहा जणांना तीन महिन्यासाठी, तर महेश अर्जुन याच्या टोळीतील सहा जणांना सहा महिन्यांसाठी पुणे जिल्हातील इंदापूर, बारामती व दौंड तालुक्‍यातून, तर सोलापूर जिल्हातील माढा व पंढरपूर तालुक्‍यांतून तडीपार करण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in