धक्कादायक : लहान भावाच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने थोरल्यानेही जीव सोडला  - Shocking : Big brother also died due to the shock of her younger brother's death | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

धक्कादायक : लहान भावाच्या मृत्यूच्या धक्‍क्‍याने थोरल्यानेही जीव सोडला 

राजकुमार थोरात 
रविवार, 12 जुलै 2020

वडील परदेशात नोकरीला... दोन्ही मुलं आईसोबत मामाच्या गावी राहात होते. आज (ता. 12 जुलै) सकाळी चक्कर (फिट) येऊन लहान भाऊ बेशुद्ध पडला. त्याला काय झालं, हे पाहण्यासाठी थोरला पळत त्याच्याकडे गेला. मात्र, त्याला बेशुद्ध पाहून तोही कोसळला. लहान भावाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने थोरल्यानेही जीव सोडला.

वालचंदनगर (जि. पुणे)  : वडील परदेशात नोकरीला... दोन्ही मुलं आईसोबत मामाच्या गावी राहात होते. आज (ता. 12 जुलै) सकाळी चक्कर (फिट) येऊन लहान भाऊ बेशुद्ध पडला. त्याला काय झालं, हे पाहण्यासाठी थोरला पळत त्याच्याकडे गेला. मात्र, त्याला बेशुद्ध पाहून तोही कोसळला. लहान भावाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने थोरल्यानेही जीव सोडला. ही ह्‌द्‌यद्रावक घटना घडली आहे, इंदापूर तालुक्‍यातील कळंब हद्दीतील भोरकरवाडीत. 

दोन सख्ख्या भावांच्या मृत्युमुळे इंदापूर तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. या घटनेत यशराज नवनाथ कडाळे (वय 15) आणि यशवंत नवनाथ कडाळे (वय 13) या दोन सख्या भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्‍यातील वालचंदनगर येथील यशराज कडाळे व यशवंत कडाळे दोघे भाऊ कळंब गावच्या हद्दीतील भोरकरवाडीमध्ये मामाच्या घरी आईसोबत राहत होते. त्यांचे वडील परदेशामध्ये नोकरी करीत आहेत. रविवारी (ता.12 जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास लहान भाऊ यशवंत कडाळे याला अचानक चक्कर आली आणि तो बाथरूम जवळ बेशुद्ध पडला. त्याला ह्‌द्‌याच्या झडपेचा पूर्वीपासून त्रास होत होता. या घटनेत यशवंत कडाळे याचा जागीच मृत्यू झाला. 

लहान भाऊ यशवंत बेशुद्ध पडल्याचे पाहून थोरला भाऊ यशराज कडाळे तातडीने लहान भावाजवळ आला. त्याच्या जवळ आल्यानंतर तोही क्षणात बेशुद्ध झाला. लहान भाऊ यशवंत याच्या मृत्यूचा धक्का मोठा भाऊ यशराज याला सहन झाला नाही. त्यामुळे त्यानेही जीव साडेला. एकाच वेळी दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

नातेवाइकांनी दोघांनाही तातडीने वालचंदनगरमधील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पण तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. बारामतीमधील सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये आज (ता.12 जुलै) दुपारी दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन्ही भावांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोन सख्खा भावांच्या मृत्युमुळे इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कळंब, वालचंदनगर, जंक्‍शन परिसरासह अख्ख्या तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. 

अनुवंशिक आजाराची शक्‍यता 

या संदर्भात वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत आणि यशराज या दोन्ही भावांना ह्‌द्‌याचा अनुवंशिक आजार असण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. त्यामुळे दोघांचाही एकाच वेळी मृत्यू झाला असावा, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख