संकटात नाते जपण्याची शरद पवारांनी पुन्हा दिली शिकवण

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्यानंतर शरद पवार यांनी आज (ता. 14 जुलै) बारामतीत आल्यानंतर बारामतीकरांसाठी एक वेगळी भेट दिली. अर्थात, कोणताही गाजावाजा न करता अगदी शांतपणे ही भेट बारामतीकरांसाठी योग्य ठिकाणी त्यांनी पोहोच केली आहे.
Sharad Pawar again taught to maintain relationship in crisis
Sharad Pawar again taught to maintain relationship in crisis

बारामती : काही नाती अतूट असतात...जगभरात गेले तरी ती कायम असतात. असंच एक नातं आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार व बारामतीकर यांचं.... गेल्या 70 ते 80 वर्षांपासून बारामती आणि शरद पवार हे एक अतूट समीकरण बनलेलं आहे. जगाच्या पाठीवर कोठेही असले तरी बारामतीकडे बारकाईने लक्ष असणे, हा शरद पवार यांचा स्थायीभावच आहे. कोणत्याही स्वरूपाचे संकट असले तरी बारामतीकरांसाठी पवारसाहेब सातत्याने खंबीरपणे उभे राहतात. 

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्यानंतर शरद पवार यांनी आज (ता. 14 जुलै) बारामतीत आल्यानंतर बारामतीकरांसाठी एक वेगळी भेट दिली. अर्थात, कोणताही गाजावाजा न करता अगदी शांतपणे ही भेट बारामतीकरांसाठी योग्य ठिकाणी त्यांनी पोहोच केली आहे. 

कोरोनाग्रस्तांना उपयुक्त असलेली रेमडीसेवरची 100 इंजेक्‍शन्स त्यांनी आज बारामतीकरांसाठी सुपूर्त केली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांच्याकडे त्यांनी ही इंजेक्‍शन्स दिली आहेत. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी ही इंजेक्‍शन्स अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना आवश्‍यकता असेल त्यांच्यासाठी या इंजेक्‍शन्सचा वापर करण्याची सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तांबे यांना केली आहे. 

या प्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. 

दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना परिस्थितीची डॉ. तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोनाची स्थिती आटोक्‍यात राहील, यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी या वेळी दिली. 

बारामतीत 23 जुलैपर्यंत लॉकडाउन 

बारामती शहरात गुरुवारपासून (ता. 16) चार दिवस कडक लॉकडाउन करण्यात येणार असून सात दिवस हा लॉकडाउन असेल असे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जाहीर केले. या संदर्भात जारी केलेल्या आदेशामध्ये दूध, औषधे व वैद्यकीय सेवा वगळता 20 जुलैपर्यंत सर्व व्यवहारांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 20 जुलैनंतर काही प्रमाणात शिथीलता दिली जाणार आहे. बारामतीचा लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत म्हणजे सात दिवस कायम असेल. 

बारामती शहरातील सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते व सर्व इतर व्यवसाय 16 ते 19 जुलैपर्यंत बंद असतील. त्यानंतर 20 ते 23 जुलै दरम्यान अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व ठोक विक्रेते यांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी एकपर्यंत सुरु असतील. इतर सर्व आस्थापना व दुकाने 23 जुलैपर्यंत बंद असतील. बाग, क्रीडांगण व मोकळ्या जागा, व्यायामशाळा, जीम, जलतरण तलाव, चित्रपटगृह बंद असतील तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकवरही 23 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com