बोहल्यावरून उतरले आणि कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झाले 

सभापती अंकुश राक्षे यांनी आपला विवाह कोणताही बडेजाव व भपकेबाज न करता अत्यंत साधेपणाने, मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत केला. लग्नसोहळा पार पडल्यावर काही वेळातच हा कोरोना योद्धा तालुक्‍याच्या सुरक्षिततेसाठी बाहेर पडला.
बोहल्यावरून उतरले आणि कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झाले 
Sabhapati of Khed Panchayat Samiti present at the service of Corona patients

चास (पुणे) : राजकारण म्हटलं की डामडौल व मोठेपणा आलाच. तो दाखवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. आपला बडेजाव दाखवण्यासाठी उत्सुक असतो. मात्र याला काही अपवाद असतात. या अपवादातील एक म्हणजे खेड तालुका पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे. 

सभापती अंकुश राक्षे यांनी आपला विवाह कोणताही बडेजाव व भपकेबाज न करता अत्यंत साधेपणाने, मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत केला. लग्नसोहळा पार पडल्यावर काही वेळातच हा कोरोना योद्धा तालुक्‍याच्या सुरक्षिततेसाठी बाहेर पडला. 

खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी जुन्नर येथील डोंगरे परिवाराची उच्चशिक्षित कन्या वसुधा यांच्याशी ठरला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. पण याच काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आणि सभापतींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे व आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून विवाह पुढे ढकलला.

विवाह पुढे ढकलून गेली काही महिन्यापासून राक्षे यांनी तालुक्‍यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवस रात्र गावोगावी फिरून जनजागृती करत कोरोना योद्धाप्रमाणे काम केले. कोरोनाच्या या विषाणूचा फैलाव तालुक्‍यात कमीत कमी, कसा राहिल, यासाठी प्रयत्न केले. 

थोडीशी उसंत मिळताच त्यांनी दोन्ही परिवारातील मोजकीच माणसे व मित्र परिवाराच्या साक्षीने सोमवारी ता. 15 जून रोजी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत कोणताही गाजावाजा न करता आपला विवाह सोहळा पार पाडला. कोरोनाचे सावट असताना मास्क, सॅनिटायझर, टनेल यांसह सर्व सोपस्कर पार पाडत विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला.

विशेष बाब म्हणजे कोरोना विषाणूचे सावट आल्यापासून राक्षे यांनी तालुक्‍यात रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून गावोगावी जनजागृती केली. आयसोलेशन वॉर्ड, रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्याबरोबरच त्यांची ने- आण करण्यासाठी विशेष योगदान दिले. 

मध्यंतरी आलेल्या निसर्ग चक्री वादळातही नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून मदतीचा हात पुढे केला. विशेष बाब म्हणजे पंधरा तारखेला लग्न सोहळा होताच सभापती तातडीने कोरोना विरोधातील लढाईत सामील झाले. आत्ताच आपले लग्न झाले आहे, हे विसरून ते समाजाच्या सेवेसाठी एखाद्या योद्धाप्रमाणे सरसावले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in