पुणेकरांची चिंता वाढली; कोरोनाचे एकाच दिवसात 14 बळी 

पुण्यातील बहुतांशी व्यवहार सुरू होऊन चोवीस तासही उलटले नाहीत; तेच कोरोनाने इशारा देत बुधवारी एका दिवसात 14 जणांचा जीव घेतला आहे. कोरोनाचा धाक इतका मर्यादित न राहता 165 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 43 जणांना "व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले आहेत.
पुणेकरांची चिंता वाढली; कोरोनाचे एकाच दिवसात 14 बळी 
The risk of corona increased in Pune

पुणे : पुण्यातील बहुतांशी व्यवहार सुरू होऊन चोवीस तासही उलटले नाहीत; तेच कोरोनाने इशारा देत बुधवारी एकाच दिवसात 14 जणांचा जीव घेतला आहे. 

कोरोनाचा धाक इतका मर्यादित न राहता 165 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 43 जणांना "व्हेंटिलेटर'वर ठेवण्यात आले आहे. एवढे सगळे झाल्यावर मात्र एक दिलासादायक बाब आहे, ती म्हणजे, दिवसभरात 113 रुग्णांनी कोरोनावर मात करीत आपले घर गाठले आहे, तर नव्या 152 रुग्णांची भर पडली आहे. 

दरम्यान, आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद बुधवारी झाली आहे. याआधी एका दिवसात 13 बळी गेले होते, त्यामुळे पुण्यातील कोरोनाच्या बळींची संख्या आजघडीला 221 पर्यंत गेली आहे. महापालिका, खासगी आणि ससून आदी रुग्णालयांमधील रुग्ण मरण पावल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. या मृतांमध्ये सर्व रुग्ण 37, 40 आणि 50 पेक्षा अधिक वयाचे आहे. 

मृतांना कोरोनासोबत इतरही आजार असल्याचे उघड झाले आहे. अन्य आजारामुळे मृतांची संख्या वाढल्याचे कारण महापालिका प्रशासनाने दिले आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढल्याने पुणेकरांत समाधान होते. मात्र, गेल्या पाच दिवसांत नवे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याने पुन्हा घबराट पसरली आहे. 

शहरात आतापर्यंत 35 हजार 302 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 3 हजार 899 जणांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील 2 हजार 23 रुग्ण ठणठणीत होऊन आपापल्या घरी परतले आहेत. त्यात बुधवारी पुन्हा 113 जणांची भर पडली. आतापर्यंत 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांमध्ये 3 हजार 899 पैकी 1 हजार 656 इतक्‍याच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

सध्या रोज दीड हजार लोकांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचल्यानेच रुग्णांची संख्या वाढत आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान शहरातील बाधित क्षेत्र वगळता अन्य भागांतील बहुतांशी व्यवहार बुधवारपासून सुरू झाले आहेत. त्याननंतरच्या काही तासांमध्ये नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in