The report of five people from Jambe is positive. | Sarkarnama

'आयटीयन्स'ची चिंता वाढली ; 'हा' परिसर कन्टेमेंट झोन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

जांबे येथील लाईफ रिपब्लिकमध्ये राहणाऱ्या  पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत. 

हिंजवडी : जांबे (ता. मुळशी) येथील लाईफ रिपब्लिक सोसायटी व माणमधील मेगा पोलिस सोसायटीची एक इमारत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कन्टेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली. 
 
माणच्या मेगा पोलिस टाऊन शिपमधील एका इमारतीत वास्तव्यास असलेल्या महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. मात्र, तिच्या संपर्कात आलेल्या इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने माणवासीयांची चिंता कमी झाली होती. जांबे येथील लाईफ रिपब्लिकमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत. 

परिणामी या परिसरातील आयटीयन्सची चिंता वाढली आहे. या भागात कोरोनाचा अधिक फैलाव होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जांबे व माणच्या या सोसायट्याचा भाग कन्टेमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. पुढील पंधरा दिवस या सोसायट्यामधील रहिवाशांना बाहेर पडता येणार नाही व विनापरवाना आत कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, फक्त दूध व भाज्या सोसायटीच्या आवारात पुरविल्या जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले. मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार म्हणाले, ''जांबे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना देखील कोरोनाची लागन झाल्याने संसर्ग अधिक वाढू नये, म्हणून प्रशासन या भागावर अधिक लक्ष ठेवून आहे.''

 

या सोसायट्यामध्ये सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व कुटूंबाचा सर्वे करून काही व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

संदीप जठार, मुळशीचे गटविकास अधिकारी

 

कोरोनामुळे तो नोटासुद्धा इस्त्री करुन घेतो
 
नाशिक :  कोरोनाच्या लॉकडाउननंतर दुकान सुरु केल्यावर शहरातील एका हलवायाने कोरोनाला दाराबाहेर ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. ग्राहकांनी दिलेल्या नोटा तो स्विकारतो मात्र, हाताचा स्पर्श न करता चिमट्याने. जवळच त्याने इस्त्री ठेवली आहे. या नोटांना इस्त्री करुन त्या कडक अर्थात कोरोनामुक्त झाल्यावर मगच तो त्या गल्ल्यात टाकतो. हा एक नवा प्रकार कोरोनाने लोकांना दाखवला आहे. 

पंचवटी पोलिस ठाण्यासमोरील ओम दुग्धालय अन्‌ स्वीटस्‌चे मालक महेश बनछोडे यांनी "करन्सी'ला थेट स्पर्श न करता व्यापार करण्याचा पर्याय शोधला आहे. ते ग्राहकांकडून लांब चिमट्याने नोटा घेतात. त्या नोटेला कडक इस्त्री करतात अन्‌ त्यानंतर गल्ल्यात नोटा ठेवल्या जातात. चिमट्याने नोटा घेऊन इस्त्री केली जाते म्हटल्यावर नाण्यांचं काय? असा स्वाभाविक प्रश्‍न तयार होतो. त्यावरही श्री. बनछोडे यांनी पर्याय केलायं. नाणी सॅनिटायझरमध्ये टाकून मग ती गल्ल्यात ठेवली जातात. ग्राहक त्यांना "अण्णा' या टोपण नावाने संबोधतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख