पुणे, पिंपरी अनलॅाक; ग्रामीण भागालाही दिलासा; हॅाटेल, दुकानांच्या वेळा बदलल्या - Pune, Pimpri-Chinchwad Unlocked-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पुणे, पिंपरी अनलॅाक; ग्रामीण भागालाही दिलासा; हॅाटेल, दुकानांच्या वेळा बदलल्या

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 8 ऑगस्ट 2021

पुणे ग्रामीणला लेवल ४ चे निर्बंध शिथिल करुन तीनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पुणे : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत पुणे (Pune) शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबातची माहिती दिली आहे. पुण्यात सर्व दुकाने सर्व दिवशी रात्री ८ पर्यंत सुरु राहतील. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा पर्यंत सुरु राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. हे नियम सोमवार (ता. ९ ऑगस्ट) पासून लागू होणार आहेत. (Pune, Pimpri-Chinchwad Unlocked) 

हेही वाचा : भाजपचे राज्यातील दिग्गज नेते दिल्लीत; मोठ्या घडामोडींची चिन्हे!

दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टी नुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील. कोरोना लशीचे दोन डोस झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल येणार आहे. मॉल राञी 8 पर्यंत सुरु राहणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. जलतरण तलावासह इतर नजीकचा संपर्क येणाऱ्या क्रिडा प्रकाराणा पुर्वीचेच बंधने असतील. तर इतर सर्व क्रिडा प्रकार यांच्या नियमीत वेळेनुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

मात्र, पुणे ग्रामीणला लेवल ४ चे निर्बंध शिथिल करुन तीनचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानांना आणि हॅाटेलला 4 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. निर्बंध शिथिल करण्यात येत असले तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बध लावणार, असा ईशाराही अजित पवार यांनी दिला.   

दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्यानंतर काही जिल्ह्यातील निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड सहर ११ जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळाला नव्हात. त्यामुळे येथील व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. आज अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडला दिलासा दिला आहे. 

हेही वाचा : नाराज आमदारांची गुप्त बैठक; पुढील निर्णय लवकरच

शहरातील कोरोना पॉझीटीव्हीटी रेट हा पाच टक्क्यांखाली येऊनही निर्बंध शिथिल न केल्याने ते करण्याची मागणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनी केली होती. दोन्ही शहरातील कोरोना पॉझीटीव्हीटी रेट हा साडेतीन टक्यांवर येऊनही ही सवलत न दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याच बरोबर व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता. त्यामुळे आज हे निर्बंध शिथिल करण्याबाबत आले आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख