पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होम क्वारंटाइन  - Pune Divisional Commissioner Dr. Deepak Mhaisekar Home Quarantine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर होम क्वारंटाइन 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 14 जुलै 2020

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. दीपक म्हैसेकर हे होम क्वारंटाइन (घरीच विलगीकरण) झाले आहेत. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. दीपक म्हैसेकर हे होम क्वारंटाइन (घरीच विलगीकरण) झाले आहेत. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत ते घरातूनच कामकाज करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये डॉ. म्हैसेकर हे स्वतः प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्या ठिकाणी संबंधितांना सूचना करीत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

पुणे शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी डॉ. म्हैसेकर हे उपाय योजना करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकष्ठा करण्यात येत आहे. मंत्री, अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये ते कायम सहभागी असतात. 

दरम्यान, डॉ. म्हैसेकर यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. वाहन चालकाचा कोरोना चाचणीचा अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी स्वतः घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) करून घेतले आहे. डॉ. म्हैसेकर यांनी स्वतः घरीच विलगीकरण करून घेतले असून, काही दिवस ते घरूनच कार्यालयीन कामकाज पाहणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

आमदारांसोबत उद्‌घाटनासाठी गेले आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन आले! 

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. पुण्यातील एका आमदाराच्या उपस्थितीत एका टेस्ट सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. कोरोनाच्या काळात ठेवण्यात आलेला जनसंपर्क लक्षात घेऊन आमदार महोदयांनी स्वतः आणि काही कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. केवळ अर्ध्या तासात चाचणीचा अहवाल आला. मात्र, तो पाहून सर्वजण चक्रावले. कारण, चार कार्यकर्त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सुदैवाने, आमदार साहेबांचा अहवाला मात्र निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

पुण्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महापालिकेने कोरोना केअर सेंटर आणि स्वॅब कलेक्‍शन सेंटर येथे रॅपिड टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यासाठी आरसीएमआरची मान्यता असलेल्या कंपनीकडून महापालिका प्रशासानाने एक लाख किट खरेदी केल्या आहेत. 

कोरोनाचे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर तत्काळ उपचार करता यावेत. यासोबतच शहरातील मृत्यदर कमी करता येईल, असा या रॅपिड टेस्ट सुरू करण्यामागचा हेतू आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख