पुणे शहरात अडीच महिन्यात पाच हजार कोरोना रुग्ण 

पुणे शहरातील कोरोना रुग्णांनी सोमवारी (ता. 25) पाच हजारांचा आकडा क्रॉस (ओलांडला) केला. गेल्या 77 दिवसांत फक्त पुणे शहरात (ग्रामीण, पिंपरी-चिंचवड व नगरपालिका वगळता) एकूण पाच हजार 258 रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यानुसार शहरात दिवसाला सरासरी 68 नवे रुग्ण आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहरात अडीच महिन्यात पाच हजार कोरोना रुग्ण 
Pune city crossed by five thousand corona patients

पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णांनी सोमवारी (ता. 25) पाच हजारांचा आकडा क्रॉस (ओलांडला) केला. गेल्या 77 दिवसांत फक्त पुणे शहरात (ग्रामीण, पिंपरी-चिंचवड व नगरपालिका वगळता) एकूण पाच हजार 258 रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यानुसार शहरात दिवसाला सरासरी 68 नवे रुग्ण आढळून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण 9 मार्चला पुणे शहरात सापडला होता. दरम्यान, सोमवार अखेरपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांच्या बळींची संख्या 256 झाली आहे. या शिवाय, पुणे जिल्ह्यातील रुग्ण संख्येनेही सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

शहरातील रुग्णवाढीचा हाच वेग कायम राहिल्यास, येत्या 15 जूनपर्यंत हा आकडा साडेसहा हजारांवर जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारअखेरपर्यंत शहरातील एकूण रुग्ण संख्या पाच हजार 258 झाली आहे. यामध्ये सोमवारी दिवसभरातील 399 नव्या रुग्णांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात गावनिहाय विलगीकरण समित्या 

पुणे : राज्य सरकारने परराज्यातील आणि परजिल्ह्यातील नागरिकांना आपापल्या मूळ गावी परतण्यासाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोणाला गृह विलगीकरण आणि कोणाला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवावे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गावनिहाय ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. 

गावचे सरपंच या समितीचे पद्धसिद्ध अध्यक्ष तर, तलाठी हे सहअध्यक्ष असणार आहेत. संबंधित गावचे ग्रामसेवक हे या समितीचे सदस्य-सचिव असणार आहेत. या समितीच्या सदस्यपदी पोलिस पाटील, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहायक, आरोग्य सेवक, महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्ष, बचत गट सचिव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील. 

परराज्यातील आणि परजिल्ह्यातील काही स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या मूळ गावी परतण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गावागावांत परराज्यातील आणि परजिल्ह्यातील नागरिक परतणार आहेत. यामुळे यापैकी कोणाला गृह विलगीकरण (होम क्वरांटाइन) आणि कोणाला संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वरांटाइन) कक्षात ठेवायचे, यांचा निर्णय ही समिती घेणार आहे. मात्र या समितीने मनमानी करू नये, या उद्देशाने याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या नियमावलीतील तरतुदीनुसारच व्यक्तीनिहाय विलगीकरण कक्ष निश्‍चित करावा लागणार आहे. 

दरम्यान, संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वरांटाइन) कक्षासाठी शाळा, समाजमंदिर, सभागृह किंवा अन्य मोठा हॉल आदींपैकी कोणत्याही एकाची निवड करावी आणि याठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. 

जिल्ह्याचा एकूण आकडा सहा हजार 153 झाला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील 383 (आजच्या 38 रुग्णांसह), ग्रामीण भागातील 186 (नवीन 14 रुग्णांसह) आणि नगरपालिका व कटक मंडळांमधील मिळून 337 (नवे 19) रुग्णांचा समावेश आहे. 

पुणे जिल्ह्यातील 281 कोरोना रुग्णांचा 55 दिवसांत बळी गेला आहे. शहरातील पहिला कोरोना बळी 31 मार्चला गेला होता. एकूण बळींपैकी पुणे शहरातील 252, पिंपरी चिंचवडमधील तेरा आणि जिल्हा ग्रामीण, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून 16 जणांचा समावेश आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in