छत्रपती कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष मालमत्ता गहाण ठेवण्यावरून भिडले 

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी मागील गाळप हंगाम सुरू करण्यासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले , असा दावा केला आहे. त्या दाव्यावरुन तालुक्यात वादंग निर्माण झाले आहे.
छत्रपती कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष मालमत्ता गहाण ठेवण्यावरून भिडले 
Political allegations against each other by the president and former president of Chhatrapati Sugar Factory

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी मागील गाळप हंगाम सुरू करण्यासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले, असा दावा केला आहे. त्या दाव्यावरुन तालुक्यात वादंग निर्माण झाले आहे. छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘अध्यक्ष काटे हे खोटे बोलत आहेत. ते सभासदांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करून काटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा,’ अशी मागणी केली आहे. 

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामा संदर्भात शुक्रवारी (ता.१७  जुलै) एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती. त्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती कारखान्याचा मागील गाळप हंगाम अत्यंत अडचणीचा ठरला आहे. साखरेची जून २०१९ पासून विक्री न झाल्याने पैसे उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे गळीत हंगाम सुरू करण्यास अडचण निर्माण झाली होती. मात्र, त्याही परिस्थितीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केल्याचा दावा करण्यात आला होता. 

या दाव्याला शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आव्हान दिले आहे. कारखान्याच्या प्रशासनाला त्यांनी पत्र पाठवून अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कारखान्यासाठी कुठली मालमत्ता गहाण ठेवली. त्या बदल्यात किती रक्कम उपलब्ध झाली. त्या रक्कमेचा विनियोग कसा केला गेला, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. मात्र, कारखान्याकडून त्याबाबत कुठलाही खुलासा करण्यात आला नसल्याचे जाचक यांनी म्हटले आहे. 

छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे हे खोटे बोलून सभासदांची दिशाभूल करीत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाची मुदत संपली असून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, छत्रपती कारखान्याने मळी विक्री करण्यापूर्वी खासगी कंपनीकडून मळीपोटी आगाऊ रक्कम घेतली होती. त्या बद्दल्यात स्वत:चा धनादेश दिला होता. स्वत:ची कसल्याही प्रकाराची मालमत्ता गहाण ठेवली नसल्याचा आरोप पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. अध्यक्ष काटे यांनी मालमत्ता गहाण ठेवली असली तर आता संचालक मंडळानेही स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून एफआरपीचे थकीत प्रतिटन ३९८ रुपये आणि कामगारांचा रखडलेला पगार तातडीने द्यावा, अशी मागणी जाचक यांनी केली आहे. 


गतवर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये छत्रपती कारखान्यासमोर अनेक प्रश्‍न होते. कारखान्याला १९.६९ कोटींचे देणे बाकी असल्याने मळी विकत घेणाऱ्या खासगी कंपनीशी वैयक्तिक स्वरूपाचा करार करून दहा कोटी रुपये जमा केले होते. त्याबद्दल्यात स्वतःच्या खात्याचा  धनादेश दिला होता. 

-प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना 

Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in