पुण्यात रुग्ण वाढले तरी महापालिका आशावादी! कारण.....

पुण्यात आता रोज पाच हजार टेस्ट करण्याचा मानस महापालिकेने केला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढलेली दिसली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही नक्कीच वाढणार असल्याने पालिका आशावादी आहे.
पुण्यात रुग्ण वाढले तरी महापालिका आशावादी! कारण.....
corona pune

पुणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना लवकरच येतील. मात्र, पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असल्यामुळे अटी व शर्ती राहतील. त्यात फारसा बदल होणार नाही, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.

पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळता उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. या नागरिकांना पुण्यात आल्यानंतर होम क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर कोणीही परस्पर लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करू नये, असे आदेश राम यांनी दिले.

पुण्यात रोज पाच हजार टेस्ट करणार : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या रोज सरासरी दीड हजार नागरिकांची तपासणी केली जात असून, यापुढे रोज़ पाच हज़ार जणांची तपासणी करणयाचे नियोजन आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्पष्ट केले. रुग्ण संपर्कातील लोकांचे स्वॅब घेऊन त्यांच्यावर पुढचे उपाचर करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. घरोघरी जाऊनही नागरिकांची तपासणी होत आहे,
रूग्ण आणि संशयितांसाठी महापालिका, खासगी हॉस्पिटलमधील सेवा-सुविधा विस्तारण्यात आल्या आहेत. संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्यात आल्याने निगेटिव्ह असलेल्यांना विलग ठेवण्याची व्यवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाला थोपविण्यासाठी महापालिकेच्या पातळ्यांवर उपाय सुरू असले तरी, रोज नव्या कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रोज दोनशेहून अधिक रुण वाढत आहे. त्यामुळे महापालिका आणि पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमध्ये सवलती देत, काही दुकाने उघडली जात आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची चिन्हे आहेत. मात्र, रुग्ण कमी करतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे आशादायी चित्र असल्याचे महापालिका सांगत आहे.

पुण्यात दिवसभरात १०२ रूग्ण; ४९ कोरोनामुक्त तर पाच जणांचा मृत्यू


पुण्यात सलग दोन दिवस दोनशेचा टप्पा ओलांडलेली कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी मात्र, निम्म्याने कमी झाली असून, दिवसभरात १०२ नवे सापडले आहेत. ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, विविध रुग्णालयांतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्यांची संख्या दोनशेच्या घरात पोचली आहे. गंभीर बाब म्हणजे, २० वर्षांच्या एका महिलेचा बळी गेला आहे.

दरम्यान, विविध रुग्णालयांतील १४८ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ५० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. सध्या विविध रुग्णालयांत १ हजार ५९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या दोन दिवसांत रुग्ण वाढीचा वेग पाहता नव्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडण्याची भीती आहे. तर दिवसभरात १०२ रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. पुण्यात आतापर्यंत सुमारे ३२ हजार २३६ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३ हजार ५९८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. मात्र, त्यातील १९९ रुग्ण मरण पावले आहेत. एक हजार ८०० रूगण कोरोनामुक्त झाल्याने ते आपापल्या घरी गेले आहे. शिवाय, १४८ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in