पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना अटक 
Prasad Shetty .jpg

पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना अटक 

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मार्केट यार्ड पोलिसांनी 53 हजार 900 रुपये रोख रक्कम आणिएक लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारासोबतच जुगार खेळणाऱ्याची मुजोरी पाह्याला मिळत आहे. मार्केटयार्ड येथे एक धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येथील उच्चभू परिसरात एका बंगल्यात सुरु असलेल्या जुगारावर कारवाई केली. यामध्ये एका नगरसेवकासह १८ जणांना ताब्यात घेतली आहे.  (Pimpri-Chinchwad corporator arrested while gambling in Pune)

पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक प्रसाद शंकर शेट्टी (Prasad Shetty) यांना मार्केटयार्ड परिसरातील विपुल या बंगल्यात जुगार खेळताना अटक केली आहे. प्रसाद शेट्टी (वय ४८ रा. शिवशांती निवास, निगडी प्राधिकरण पुणे) यांच्या सोबत अन्य १८ आरोपींना देखिल मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मार्केट यार्ड पोलिसांनी 53 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि एक लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.

हे ही वाचा 

कोरोना रुग्णाकडून अवाजवी रक्कम उकळणाऱ्या डॅाक्टरवर पुणे जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल 

पिंपरी : राज्यामध्ये कोरोना (Kovid-19) उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिल वसूल केल्यामुळे चाकण येथील क्रिटीकेअर रुग्णालायाच्या (Criticare Hospital) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ ते ९ सप्टेंबर दरम्यान, चाकणमध्ये हा प्रकार घडला आहे.  

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांती अवाजवी बीले दिले असल्याच्या तक्रारी आल्यानंतर खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. चाकण येथील रुग्णालायने शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून 2 लाख 53 हजारांची रक्कम उकळल्या प्रकरणी आणि वारंवार सांगूनही ती रक्कम परत न केल्यामुळे क्रिटीकेअर रुग्णालयाचे संचालक संचालक डॉ. घाटकर डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे आणि डॉ. सीमा गवळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॅा. नंदा गणपत ढवळे (वय ५८) यांनी शनिवारी चाकण पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये कोरोना रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या रुग्णालयाने उपचाराचे बिल सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक वसूल केले. याबाबत वैद्यकीय अधिक्षक नंदा ढवळे यांनी रुग्णालयाच्या संचालकांना रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे परत करण्यास वारंवार सांगितले. मात्र, चंचालकांनी पुष्पा विजय पोखरकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणचा अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत. 

 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in