आमचा राष्ट्रीय नव्हे तर जागतिक पक्ष; संभाजी ब्रिगेडच्या ऑफरचे पाहू

संभाव्य वटहुकूमाचा फायदा येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाच जिल्हा परिषद निवडणुकीत होणार नाही.
 Chandrakant Patil .jpg
Chandrakant Patil .jpg

पिंपरी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णयराज्य मंत्रीमंडळाने काल (ता.१५) घेतला असून त्यासंदर्भात लवकरच अध्यादेश काढला जाणार आहे. मात्र, तो येण्यापूर्वीच त्याविषयी भाजपने साशंकता व्यक्त केली आहे. तो लागू होईल, की नाही. हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी तसेच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली. असेच मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही आज (ता.१६) व्यक्त केले. हा वटहुकूम सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. असे ते म्हणाले. कारण तो शॉर्टकट आहे. ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा तो प्रकार आहे. असा आरोप त्यांनी आज श्रीक्षेत्र देहू (ता. मावळ, जि. पुणे) येथे केला. (Patil said, BJP has not received the proposal of Sambhaji Brigade alliance) 

या संभाव्य वटहुकूमाचा फायदा येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाच जिल्हा परिषद निवडणुकीत होणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच त्याचा फटका ओबीसी पुढील निवडणुकीत ओबीसी जागांना बसणार असून त्या कमी होणार आहेत. २७ टक्यावरून हे प्रमाण २० टक्के इतके होईल. याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच हा अध्यादेश काढायचा होता, तर तो तीन-चार महिने अगोदर काढायला हवा होता. असे ते म्हणाले.. 

तसेच हा वटहुकूम न्यायालयात टिकेल की नाही. याविषयी त्यांनी शंका व्यक्त केली. कारण तो काढायला न्यायालयाने सांगितलेच नव्हते. तर ओबीसींचा इंपिरिकल डाटा गोळा करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यावर चार महिन्यात सुईच्या टोकाएवढेही काम राज्य सरकारकडून झाले नाही. त्याऐवजी त्यांनी वटहुकूमाचा हा जवळचा मार्ग शोधल्याने तो टिकेल की नाही. याविषयी शंकाच आहे, असे ते म्हणाले.

आगामी निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडशी युती करण्याच्या सुरु असलेल्या चर्चेवर पाटील यांनी यासंदर्भात अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच तो आल्यानंतरही त्यावर पक्षाची राज्य कोअर कमिटी निर्णय घेईल, असे असे ते म्हणाले. आमचा राष्ट्रीय नाही, तर जागतिक पक्ष आहे. त्यामुळे ब्रिगेडच्या ऑफरचे काय परिणाम होतील. हे पाहून निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्षे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ते पुन्हा सुरु झाले पाहिजे. ते बंद राहणे परवडणारे नाही. नाही, तर यातूनही आत्महत्या होतील. कारण आता बचत नसलेले कर्ज घेऊन जगत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com