त्या ड्रायव्हरच्या माहितीने पंकजा मुंडे भारावून गेल्या

गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे सर्व बघत होता.
त्या ड्रायव्हरच्या माहितीने पंकजा मुंडे भारावून गेल्या
Pankaja Munde was overwhelmed by the information of that driver

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे या सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. विविध ठिकाणी आलेले अनुभव त्या या माध्यमातून शेअर करत असतात.

आताही कुटुंबीयांसह महाबळेश्‍वरच्या खासगी दौऱ्यावर असलेल्या पंकजा यांना मुंडे कुटुंबावर असलेल्या जनतेच्या प्रेमाचा पुन्हा एकदा अनुभव आला. तो अनुभव पंकजा यांनी ट्विटरवर पोस्ट लिहित शेअर केला आहे. त्यात त्यांना भेटलेल्या एका ड्रायव्हरबाबतचा किस्सा सांगितला आहे. 

पंकजा मुंडे या आपल्या दौऱ्यात आलेले अनुभव सोशल मीडियातून मांडत असतात. आजही (ता. 23 जानेवारी) त्यांनी ड्रायव्हर असलेल्या एका चाहत्याचा अनुभव ट्विटच्या माध्यमातून सांगितला आहे. 

ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, "लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो, याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण, मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी, पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. तेथून परत येताना रस्त्यात नेहमीप्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली.'' 

"लोंढे नावाचे ड्रायव्हर होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती, ते कशी ठेवतात, हे सांगितले. अगदी माझ्या पोस्ट ते किती आपुलकीने लाइक करतात, हेही आवूर्जन सांगितले. तितक्‍यात गाडीतील विद्यार्थी खाली उतरले. बाजूच्या बसमधील प्रवासीही उतरले. या सर्वांनी माझ्यासोबत फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे सर्व बघत होता,'' असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in