सावधान : एकट्या ससुन रुग्णालयातच म्युकरमायकोसिसचे दोनशे रुग्ण

म्युकरमायकोसिसला देशातील बहुतेक राज्यांनी महामारी म्हणून घोषित केले आहे.
Over 200 Mucormycosis patients in sasoon Hospital
Over 200 Mucormycosis patients in sasoon Hospital

पुणे : कोरोनामुक्त रुग्णांना म्युकरमायकोसिसचा (Black Fungus) धोका वाढतच चालला आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू ओढवण्याची भीती आहे. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पुण्यातील ससुन रुग्णालयात आतापर्यंत 200 हून अधिक रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 100 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Over 200 Mucormycosis patients in Sasoon Hospital)

म्युकरमायकोसिसला देशातील बहुतेक राज्यांनी महामारी म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारने याबाबत सर्वच राज्यांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. कोरोनाबरोबरच आता या आजारासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करावी लागत आहे. काळी बुरशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराची तीव्रता वाढत असून औषधेही उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण होत आहे. 

पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णाल्या मध्ये म्युकरमायकोसिस ची महामारी सुरु झाल्यापासून 200 हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. दररोज ७ ते ८ नविन रुग्ण भरती होत आहे. गुरूवारी ससुन रुग्णाल्यामध्ये म्युकरमायकोसिसची शंभरावी शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये 11 रुग्णांच्या मेंदूच्या रक्त वाहिनी मध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्रक्रिया करण्यात आली आणि ४ रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पू झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

यापैकी बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) या योजने अंतर्गत करण्यात आल्या. हा आजार, बहुतांश कोविड १९ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. कोविड आजाराच्या वेळी देण्यात आलेल्या Steroid injection त्याच बरोबर, रुग्णाला असलेल्या मधुमेह, उच्चरक्त दाब, कर्करोग व कमी प्रतिकार शक्ती असल्यास, ह्या बुरशीचा सहजरित्या रुग्णांच्या नाकामधून शरिरामध्ये शिरकाव होतो. ही बुरशी पुढे जाऊन, डोळे व मेंदू मध्ये संसर्ग करते ज्यामुळे रुग्ण दृष्टी किंवा प्राण गमावू शकतो.

रुग्णालयाकडून घेतली जातेय दक्षता

म्युकरमायकोसिसचे वैद्यकीय व्यवस्थापन डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. शशिकला सांगले, डॉ नेहा सुर्यवंशी व डॉ.महेश दराडे पाहत आहेत. उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचीची व्यवस्था MJPJAY योजनेच्या प्रभारी डॉ. भारती दासवानी यांनी केलेल्या नियोजनातून करण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांच्याकडून या आजाराच्या रुग्णांवरील शस्त्रक्रियांसाठी नियोजन केले जात आहे.

कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. समिर जोशी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहूल तेलंग, डॉ. संजयकुमार सोनावले, डॅा. अफशान शेख, डॉ. किरीट यथाटी, डॉ. चेरी रॉय यांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या. तसेच डॉ. संयोगिता नाईक, डॉ प्रज्ञा भालेराव, डॉ सुरेखा शिंदे, डॉ शीतल, डॉ. संजीवनी आंबेकर, डॉ. सतिश शितोळे, अधिसेविका सुनिता खतगावकर व परिसेविका निर्मला पवार, मार्गारेट जगले, सिद्धार्थ जाधव आदींकडून म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी प्रयत्न केले जात आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com