पुण्यातील व्यापाऱ्यांचा लॉकडाउन वाढविण्यास तीव्र विरोध 

लॉकडाउनमुळे व्यापारी, व्यावसायिकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता लॉकडाउन आणखी वाढवू नये, अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे. लॉकडाउननंतर व्यापारी महासंघ आणि पुणे महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी शिबिर घेण्याची तयारीदेखील महासंघाने दाखवली आहे.
पुण्यातील व्यापाऱ्यांचा लॉकडाउन वाढविण्यास तीव्र विरोध 
Opposition to increase lockdown of traders in Pune

पुणे : लॉकडाउनमुळे व्यापारी, व्यावसायिकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता लॉकडाउन आणखी वाढवू नये, अशी मागणी पुण्यातील व्यापाऱ्यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे. लॉकडाउननंतर व्यापारी महासंघ आणि पुणे महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी शिबिर घेण्याची तयारीदेखील महासंघाने दाखवली आहे. 

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितळिया यांनी आज (ता. १८ जुलै) महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थतीत लॉकडाउन वाढवू नका, अशी आग्रहाची विनंती त्यांनी आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे. तीन महिन्यांच्या लॉकडाउन नंतर व्यवसायाला सुरवात होत असताना पुन्हा एकदा लॉकडाउन लादल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.

सरकारच्या लॉकडाउनच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारे सरकारी मदत मिळत नाही. करांमध्ये कोणतीही सूट मिळत नाही, बँकांचे व्याज, दुकानाचे भाडे , भरमसाठ लाइट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार, घरखर्च असे अनेक खर्च आहेत. दुसरीकडे व्यवसाय ठप्प असल्याने कोणतीही आवक नाही. त्यामुळे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत, असे रांका यांनी सांगितले. 

तीन महिन्यांतच्या लॉकडाउनमुळे पुण्यातील व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक अर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या महिन्यात लॉकडाउनमध्ये सूट मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांचे व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाले होते. मात्र, पुण्यात रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दहा दिवसांचा बंद लादण्यात आल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे.

पुण्यात सामान्य नागरीकांची भावनादेखील अशीच आहे. वास्तविक लॉकडाऊनची गरज नव्हती. मात्र, राज्य सरकार व महापालिकेच्या यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाउन केल्याची नागरीकांची भावना आहे. येत्या २३ जुलैनंतर लॉकडाउन आणखी वाढवला जाऊ शकतो, अशी सर्वानाच भीती वाटत असल्याने सर्व क्षेत्रातून लॉकडाउन वाढवू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. 


हसन मुश्रीफ म्हणतात, ‘हात जोडतो; पण मास्क वापरा, दवाखान्यात जावा’ 

कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरलाच पाहिजे. कोरोना विषाणूपासून वाचण्याचा हा एकच उपाय आहे. मास्क गळ्यात अडकविणे, नाकाखाली घेणे हे धोक्‍याचे आहे. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तातडीने दावाखान्यात जा. डॉक्‍टरांच्या सहाय्याने कोरोनाची टेस्ट करुन घ्या, अशी विनंती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

लोकांनी जर हे केले नाही तर स्वतःसह आपले कुटुंब, मित्र परिवार, सगेसोयरे संक्रमीत होऊन त्यांनाही धोका होऊ शकतो. वृद्ध माता, पिता व इतर मंडळी, लहान मुले, नातवंडे, पतवंडे ही संक्रमीत झाली तर परिस्थिती कठीण बनते. त्यावेळी कोणी ढुंकूनही पाहत नाही. खबरदारी तत्काळ घ्यावी व तुमच्या कुटुंबाला व स्वतःला वाचवा, असेही या पत्रकात आवाहन करताना मंत्री मुश्रीफ यांनी ही विनंती मी हात जोडून सर्वांना करत असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in