पुणे जिल्ह्यात प्राथमिक शाळांसाठी ऑनलाइन प्रवेश; 14 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश 
Online admission for primary schools in Pune district

पुणे जिल्ह्यात प्राथमिक शाळांसाठी ऑनलाइन प्रवेश; 14 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश ऑनलाइन करण्यासपसंती दिली आहे. गेल्या महिनाभरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पहिलीसाठी तब्बल 13 हजार 960 पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेतले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश ऑनलाइन करण्यास सर्वाधिक पसंती दिली आहे. यामुळे गेल्या महिनाभरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिलीसाठी तब्बल 13 हजार 960 पालकांनी आपापल्या पाल्याचे प्रवेश घेतले आहेत. यामध्ये खेड तालुक्‍यातील सर्वाधिक चार हजार 612 प्रवेशांचा समावेश आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 16 मार्चपासून शाळांना सुटी देण्यात आलेली आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. पण नवीन शैक्षणिक वर्षांतील प्रवेशाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.

यावर मार्ग म्हणून यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 14 एप्रिलपासून प्रवेशासाठी ऑनलाइन गुगल लिंक तयार करून सर्व पालकांना त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले. 

तालुकानिहाय आतापर्यंत झालेले प्रवेश 

आंबेगाव 470
बारामती 1770
 भोर 578
दौंड 856
हवेली 60
इंदापूर 206
जुन्नर 1938
खेड 4612
मावळ 253
मुळशी  535
पुरंदर 1028
शिरूर  1282
वेल्हे 372

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in