पुणे विभागात साडेनऊ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पंधरा हजार 198 वर पोचली असून नऊ हजार 552 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या चार हजार 965 ऍक्‍टीव रुग्ण आहेत. विभागात कोरोनामुळे एकुण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागात साडेनऊ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
Nine and a half thousand patients Corona free in Pune division

पुणे : पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पंधरा हजार 198 वर पोचली असून नऊ हजार 552 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या चार हजार 965 ऍक्‍टीव रुग्ण आहेत. विभागात कोरोनामुळे एकुण 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 262 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.85 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात 11 हजार 877 बाधीत रुग्ण असून 7 हजार 457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण 3 हजार 931 आहेत. कोरोनाबाधित एकूण 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 247 रुग्ण गंभीर आहेत. पुणे जिल्ह्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.79 टक्के आहे. 

शनिवारच्या बाधीत रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे 480, सातारा 8, सोलापूर 47, सांगली 16, तर कोल्हापूर 10 अशी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात 726 कोरोना बाधीत रुग्ण असून 499 बाधित रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 196 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 659 कोरोनाबाधित रुग्ण असून 866 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 647 आहे. कोरोनाबाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्ह्यात 216 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्णसंख्या 95 आहे. एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 720 कोरोनाबाधित रुग्ण असून 616 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्‍टीव रुग्ण संख्या 96 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

एक लाख सतरा हजार नमुने तपासले 

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 17 हजार 920 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 13 हजार 628 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 292 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 98 हजार 178 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 15 हजार 198 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in