अभिनव देशमुखांनी आवळल्या गुंड निलेश घायवळच्या मुसक्या

पोलिस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यात कडक पावले उचलली आहे.
nilesh Ghaywal arrested by pun rural police
nilesh Ghaywal arrested by pun rural police

पुणे : पोलिस अधिक्षक डॉ. अभिवन देशमुख यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यात कडक पावले उचलली आहे. त्यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस दलाला दिल्या आहेत. त्यानुसार घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्याला पुढील एक वर्षांसाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. 

गुंड निलेश घायवळ याच्याविरुध्द यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दंगा करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून ताब्यात घेण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांअंतर्गत सराईत गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार वाळू तस्कर, बेकायदा सावकारी करणारे, धोकादायक इसम, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांच्याविरूध्द पोलिसांनी मोहिम उघडली आहे. तसेच सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. 

घायवळविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एमपीडीए) कायदयातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. अभिनव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यावर निर्णय घेत घायवळला एक वर्षासाठी स्थानबध्द कऱण्याचा आदेश दिला आहे. 

पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून घायवळला ताब्यात घेतले. आज पासून एक वर्ष स्थानबध्द करणेसाठी घायवळची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

आगामी काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी एमपीडीए कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे संकेत डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत. वाळू तस्कर, बेकायदा सावकारी करणारे, धोकादायक इसम, हातभट्टी दारु माफीया व अवैध धंदे, झोपडपट्टी दादा यांच्यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com