पुण्यात शनिवारी व रविवारी काय सुरू राहणार आणि बंद, हे घ्या जाणून

परीक्षार्थींंना प्रवासाची मुभा
पुण्यात शनिवारी व रविवारी काय सुरू राहणार आणि बंद, हे घ्या जाणून
lokcdown pune

पुणे  : औषध दुकाने, दूध (सकाळी ११पर्यंत), परिक्षार्थी आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांना दोन दिवसांच्या कडक लॉकडाऊमधून वगळण्यात आले आहे. आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) या दोन दिवसांच्या लॉकडाऊन संदर्भात महापालिका आयुक्तांनी सुधारीत आदेश काढले आहेत. त्यामध्ये ही सवलत देण्यात आली आहे.

कडक लॉकडाऊनच्या काळात मे़डिकलच्या दुकनांना दोन्ही दिवस सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. अन्य सर्व प्रकाराच्या म्हणजे जीवनावश्‍यक वस्तूंसह दुकांने मात्र बंद राहातील. तर या दोन दिवसात सकाळी ६ ते ११ या वेळेत दूध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तर परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पार्सल सेवेसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ८ यावेळीत सुरू ठेवता येणार आहे. तर या दोन दिवसात बस बंद ठेवण्यात आल्यामुळे ओला-उबेर या सारख्या खासगी टॅक्सी सेवांना अत्यावश्‍यक सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

----------------- 
लॉकडाऊनच्या काळात यांना परवानगी राहिल.
-औषध दुकाने 
-दूध विक्री (सकाळी ६ ते ११) 
-परिक्षार्थी आणि त्याच्या सोबत एक पालक ( परिक्षेचे हॉल तिकीट जवळ बाळगणे आवश्‍यक) 
-झोम्याटो, स्विगी सारख्या पार्सल देणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी 
-खानावळमधून फक्त पार्सल सेवा (सकाळी ७ ते सायंकाळी ८) 
-लसीकरण सुविधा 
-हॉटेल, रेस्टॉरंट, बारमार्फत घरपोच सेवा सुरू राहील 
-घरेलु कामगार, वाहन चालक (ड्रायव्हर), स्वयंपाकी 
-जेष्ठ नागरीक आणि घरी आजारी लोकांना सेवा देणारे वैद्यकीय मदतनीस / नर्स 
-बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना बांधकाम सुरू ठेवण्यास 
-रिक्षा-ओला-उबेर टॅक्सी 
-वृत्तपत्र वितरण 
-पेट्रोल पंप 
------------------- 
कडक लॉकडाऊनच्या काळात हे राहणार बंद (सोमवारी सकाळी ७ पर्यंत) 
-किराणा दुकाने 
-मटण,चिकन, मासे विक्रीची दुकाने 
-भाजीपाला बाजार 
-चष्मे दुकाने 
- पीएमपी बस 
-मद्य विक्री दुकाने 
- बेकरी आणि त्या संबंधित उत्पादनांची दुकाने 
-खाद्यपदार्थ स्टॉल, पथारी व्यवसाय 

..................................

9 एप्रिल रोजीची रुग्णसंख्या

- दिवसभरात 5647 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात 4587  रुग्णांना डिस्चार्ज.

- करोनाबाधीत 51 रुग्णांचा मृत्यू. 07 रूग्ण पुण्याबाहेरील.

- 1003 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 301829

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 49955

- एकूण मृत्यू - 5654

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज - 262420

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 27986

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in