राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नीचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण 
NCP's Pune district president Pradip Garatkar's corona report is positive

शिक्रापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नीचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. आमच्या दोघांचीही तब्येत उत्तम आहे, असे प्रदीप गारटकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रदीप गारटकर यांचा दिनक्रम पक्ष कार्यक्रमांमुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे व्यस्त होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांशी सतत संवाद-समन्वय ठेवण्याचे काम गारटकर करीत होते. गारटकर यांनी शुक्रवारी दिलेल्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट आज प्राप्त झाले. त्यानुसार गारटकर यांचा स्वत:चा व त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गारटकर दांपत्य सध्या पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहे.

दरम्यान आम्हा दोघांचीही तब्बेत सध्या उत्तम असून केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत, असे स्वत: गारटकर यांनी सरकारनामाला सांगितले. 

दरम्यान, कोरोना विषाणूच्या काळात गरीब-गरजू, बेरोजगारांसाठी मदतीचा हात देण्याचे गारटकरांचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू होते. या शिवाय होम-ग्राउंड असलेल्या इंदापूर तालुक्यात ते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमवेत, तर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात ते सहभागी होते. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप आल्याचे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी दक्षता म्हणून स्वतःची व पत्नीची कोरोना तपासणी केली होती. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त होताच ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसांत त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांच्या बाबत आरोग्य विभागाला त्यांनी कळविले आहे. 


काळजीचे कारण नाही 

याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला व माझ्या पत्नीला गंभीर अशी लक्षणे दिसत नाहीत. मात्र, दक्षता म्हणून आम्ही उपचारासाठी दाखल होणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही दोघेही पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल झालो आहोत. आमच्या प्रकृतीविषयी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले. 


Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in