अमोल कोल्हेंच्या त्या पत्रावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी  - NCP office bearers displeased with Amol Kolhe's letter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

अमोल कोल्हेंच्या त्या पत्रावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी 

विलास काटे
गुरुवार, 25 जून 2020

आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना कार्यकाळ वाढून देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांनी शिफारस पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आळंदीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

आळंदी (पुणे) : आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांना कार्यकाळ वाढून देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांनी शिफारस पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आळंदीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

जनतेशा संपर्क नसलेल्या मुख्याधिकाऱ्यांना स्थानिकांशी न बोलता पाठीशी घातले जात असल्याबद्दल डॉ. कोल्हे आणि मोहिते यांच्याबाबत पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. 

समीर भूमकर यांचा आळंदीत मुख्याधिकारीपदाचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बदलीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेली आहे. भूमकर यांना बदलू नये, यासाठी ठेकेदारही प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र, लॉकडाउन घोषित होण्याआधीच भूमकर यांना आळंदीत कार्यकाल वाढवून द्यावा, या साठी खासदार कोल्हे आणि आमदार मोहिते यांनी शिफारस पत्र दिले होते. 

आमदार दिलीप मोहितेंची आळंदीच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाउन काळात भेट घेतली, त्या वेळी त्यांनी पत्र दिल्याची कबुली दिली. तसेच, तशी कबुली खासदार कोल्हें यांनीही दिली आहे. पदाधिकाऱ्यांनी बोलताना ते म्हणाले की अण्णांनी अर्थात आमदार मोहिते यांनी पत्र दिल्याने मी ही पत्र दिले. पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या या शिफारस पत्रावर मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. 

खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळशेठ ठाकूर यांच्या मध्यस्थीने वातावरण काहीसे थंड करण्याचा प्रयत्न झाला आहे. 

खासदार कोल्हे यांचे जवळचे आणि खंदे कार्यकर्ते असलेले ठाकूर यांच्याकडे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी दोन दिवसांपूर्वीच मोबाईलवरुन कोल्हेंविषयी नाराजी बोलून दाखवली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची खदखद ठाकूर यांनी कोल्हेंपुढे मांडली. कुऱ्हाडे यांची डॉ. कोल्हे यांच्याशी बातचित घडवून आणली. या वेळी डॉ. कोल्हे यांनी मुख्याधिकारी भूमकर यांना पाठीशी घालत नाही. तसेच, अण्णांचे नातेसंबंध नसल्याचेही सांगितले. यामुळे खासदार, आमदार यांच्यावरील नाराजी काहीसी कमी झाली आहे. 

"आळंदीतील कार्यकर्त्यांना आमदार, खासदार यांनी भूमकर यांच्याबाबत शिफारस पत्र देताना विचारात घेतले नाही. भूमकर मुख्याधिकारी म्हणून रूजू झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत नागरिकांना त्यांचे दर्शनही झालेले नाही. माहिती अधिकारात नगरसेवकांनी दिलेल्या अर्जावर उत्तरे दिलेली नाहीत. माहिती दडवली जात आहे. पाणी पुरवठा, आरोग्य याबाबत काम चांगले नाही. वॉर्डात काम करायचे असेल तर वैयक्तिक निधी आणा, असे सांगितले जाते. मुख्याधिकाऱ्यांचे वर्तन नगरसेवकांशीही चांगले नाही,' नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी सांगितले. 

कार्यकाल पूर्ण झाल्याने मुख्याधिकारी भूमकर यांचा बदली होणे अपेक्षित होते. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी मुदत वाढीसाठी फिल्डिंग लावली होती. कोरोनामुळे बदली पुढे ढकलली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मात्र बदलीबाबत आग्रही असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख