नगरसेवकाच्या प्रतिक्रियेला मी उत्तर देणार नाही; बारणेंनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली

पालिकेची निवडणूक आता जवळ आल्याने या जलपूजनावरुनही राजकारण रंगले आहे.
Shrirang Barne, Namdev Dhake .jpg
Shrirang Barne, Namdev Dhake .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरले की त्याचे जलपूजन दरवर्षी केले जाते. पालिकेची निवडणूक आता जवळ आल्याने या जलपूजनावरुनही राजकारण रंगले आहे. ते काल (ता.३०) शहरातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केले. त्यावरून जलपूजनाचा अधिकार हा महापौरांचा असल्याचे सांगत त्यांच्या अगोदर ते बारणेंनी केल्याने प्रसिद्धीलोलूप खासदारांचा हा स्टंट असल्याची टीका पिंपरी पालिकेतील सत्तारुढ भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके (Namdev Dhake) यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार बारणे यांनी आज (ता. ३१ ऑगस्ट) घेतला. नगरसेवकाच्या प्रतिक्रियेला उत्तर देत नसतो, असे सांगत त्यांनी ढाके व त्यांची टीका अशा दोन्हींकडे दूर्लक्ष केले. तसेच महापौरानीच हे जलपूजन करावे. असा जीआर आहे का असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. (MP Shrirang Barne criticizes Namdev Dhake)   

पवना धरण १०० टक्के भरल्यावर दरवर्षीप्रमाणे महापौरांच्या हस्ते जलपूजन होते. तशी प्रथाच आहे, असे सांगत बारणे यांनी मात्र, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी करत जलपुजनाचा कार्यक्रम महापौरांच्या अगोदर काल केला. असा हल्लाबोल ढाकेंनी हे जलपूजन होताच केला होता. महापौरांचा कार्यक्रम ठरलेला असताना खासदारांनी त्यांना डावलून जलपूजन करणे म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महिला महापौरांचा अवमान आहे. बारणे पिंपरी चिंचवड शहरात एक, तर मावळात गेल्यावर दुसरी भूमिका घेवून दुटप्पीपणा करतात. हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ प्रतिनिधीला शोभत नाही. अशी कडवट टीका ढाकेंनी केली होती. 

हा महापौरांचा अधिकार असताना आमचा जलपुजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर घाई गडबडीत दरवेळी आमच्या अगोदर पवना धरणावर जावून जलपूजन उरकून घेतात, असे ते खेदाने म्हणाले. वाढत्या शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी खासदार म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून शहरासाठी काय मदत मिळावली याचे स्पष्टीकरण शहरवासीयांना द्यावे, असेही आव्हानही ढाके यांनी बारणेंना दिले होते. 'सरकारनामा'शी बोलताना बारणे यांनी पवनेच्या पाण्याचे जलपूजन महापौरांनीच करावे, असा जीआर आहे का असे म्हणत ढाकेंवर शरसंधान साधले. 

खासदार झाल्यापासून गेली सात वर्षे ते आपण करीत असून सहा वर्षापासून पवना धरणात साचलेला गाळही काढत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या मतदारसंघात हे धरण असून आता ढाकेंच्या टीकेला मावळातील शेतकरीच उत्तर देतील, असे ते म्हणाले. तसेच महापौरांचा प्रोटोकॉल हा पालिकेत असतो. धरणावर नसतो, असे सांगत मावळचे आमदारही हे जलपूजन करतात. यापूर्वीच्या मावळच्या भाजप आमदारांनीही ते केले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मावळ तालुका पंचायतीचे सभापती हे जलपूजन करतात. ज्याला वाटेल त्यानेही ते करावे. असेही बारणे यांनी सांगत ढाकेंच्या टीकेतील हवाच काढून घेतली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com