खासदार अमोल कोल्हेंनी संसदरत्न पुरस्कार यांना अर्पण केला 

आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे.
MP Amol Kolhe dedicated Parliamentary Award to voters in Shirur
MP Amol Kolhe dedicated Parliamentary Award to voters in Shirur

पिंपरी : खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आणि पहिल्या दोन वर्षांतच संसदरत्न पुरस्कार पटकावणारे शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तो पुरस्कार आपल्या मतदारसंघातील मायबाप मतदार बंधू भगिनींना अर्पण केला. आपल्यासारख्या नवख्या खासदाराला पदार्पणातच मानाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

देशातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिसेन्स ई-मॅगेझिनतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार शानदार सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते खासदार कोल्हे यांना शनिवारी (ता. 20 मार्च) देण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू झाला आहे. गेल्या 12 वर्षांपासून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना तो दिला जात आहे. 

संसदेतील खासदारांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, खासगी विधेयके आणि सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तो मिळाला आहे. या लोकसभेत खासदार कोल्हे यांनी 14 चर्चासत्रांत सहभाग घेतला. सुमारे 277 प्रश्न विचारले आहेत. अल्पावधीतच प्रभावी भाषणांद्वारे छाप पाडत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक सेमी स्पीड रेल्वे, बैलगाडा शर्यती, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राच्या मुद्द्यांसह अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदेत आवाज उठविला आहे. 

मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची जाणीव यामुळे हे शक्‍य होऊ शकलं. कारण, आपला विश्वास हीच माझी ऊर्जा आहे, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सरकारनामा'ला दिली. 


हेही वाचा : हर्षवर्धन पाटलांसारखे खोटे बोलून मला जनतेची फसवणूक करायची नाही 

वालचंदनगर (जि. पुणे) ः इंदापूर तालुक्‍यातील विरोधकांना पाण्याचे राजकारण करावयाचे आहे. मला मात्र शेतीच्या पाण्यासाठी लढायचं आहे. तालुक्‍यातील त्या 22 गावांसह इतरही गावच्या शेती सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लावायचा आहे, अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेतला टीका केली. 

इंदापूर तालुक्‍यातील निमसाखर येथील रस्त्याच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री भरणे बोलत होते. भरणे यांनी सांगितले की, तालुक्‍यातील विरोधकांना (हर्षवर्धन पाटील) पाण्याचे राजकारण करावयाचे आहे. लाकडी-निंबोडी पाणी योजनेची सविस्तर माहिती ते मला विचारत आहेत. खोटी आश्‍वासने देण्याचा माझा स्वभाव नाही. मी लबाडी करणारा माणूस नाही. खोटे बोलले नागरिकांना लवकर पटते. मात्र, मला विरोधकांसारखे खोटे बोलून जनतेची फसवणूक, दिशाभूल करायची नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com