सुरफाट्या खेळत राज्यमंत्री भरणेंचा कोरोनाला हरविण्याचा संदेश - Minister of State Dattatreya Bharane conveyed the message of defeating Corona through sports | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

सुरफाट्या खेळत राज्यमंत्री भरणेंचा कोरोनाला हरविण्याचा संदेश

राजकुमार थोरात 
शनिवार, 25 जुलै 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरासह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण काळजी घेत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे नागपंचमी निमित्त  शनिवारी (ता. २५ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या सुरफाट्याच्या खेळात सहभागी होऊन सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नियमित व्यायाम करून कोरोनाला हरविण्याचा संदेश दिला.

वालचंदनगर (जि. पुणे) : कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरासह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण काळजी घेत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे नागपंचमी निमित्त  शनिवारी (ता. २५ जुलै) आयोजित करण्यात आलेल्या सुरफाट्याच्या खेळात सहभागी होऊन सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नियमित व्यायाम करून कोरोनाला हरविण्याचा संदेश दिला.
 
इंदापूरच्या राजकारणात दत्तात्रेय भरणे यांनी सलग दुसऱ्या वेळी आमदकी जिंकत राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले आहे. ते सध्या राज्यमंत्री असून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सध्या त्यांच्याकडे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी ते सोलापुरात विविध उपाय योजना करत आहेत. त्यातूनही वेळात वेळ काढून त्यांनी आज नागपंचमी निमित्त इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे आयोजित करण्यात आलेल्या सूरफाट्याच्या खेळात सहभाग घेतला. 

 

राजकारणामध्ये भल्या भल्यांना चितपट करणाऱ्या राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही सुरफाट्याच्या खेळात युवकांना थोपवून धरले. दुसऱ्या डावामध्ये समोरील संघाला सहज हरवून विजय मिळवून नियमित व्यायाम करून कोरोनालाही हरविण्याचा संदेश त्यांनी दिला.

इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे हटके नेतृत्व आहे. तालुक्यामध्ये मामा म्हणून परिचित असून सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणे, गोरगरिबांची कामे तातडीने मार्गी लावणे. पहिल्या रिंगमध्येच फोन घेणे, रस्त्याने चारचाकी गाडीने प्रवास करताना गाडी थांबवून बोलणे ही त्यांची स्वभावाची वैशिष्टये आहेत. राज्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी कधीच बडेजावपणा दाखविला नाही किंवा मंत्री असल्याचे त्यांनी कधी मिरवले नाही. 

सध्या इंदापूर तालुक्यात आणि सोलापूर जिल्हात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णाचे भरणे यांना टेन्शन आहे. नाग पंचमीनिमित्त आज शनिवारी (ता. २५ जुलै) निमगाव केतकीमध्ये सूरफाट्याचा खेळ सुरु होता. भरणे यांनी सूरफाट्याच्या खेळातील एका डावामध्ये युवकांना थोपावून धरले. तर दुसऱ्या डावरामध्ये सहज रेषा पार करुन विजयीही झाले. नियमित व्यायाम करून कोरोनालाही चितपट करण्याचा एक प्रकारचा संदेश भरणे यांनी या खेळाद्वारे दिला आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष गारटकर यांना कोरोनाची लागण 

शिक्रापूर (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नीचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. आमच्या दोघांचीही तब्येत उत्तम आहे, असे प्रदीप गारटकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या प्रदीप गारटकर यांचा दिनक्रम पक्ष कार्यक्रमांमुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे व्यस्त होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांशी सतत संवाद-समन्वय ठेवण्याचे काम गारटकर करीत होते. गारटकर यांनी शुक्रवारी दिलेल्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट आज प्राप्त झाले. त्यानुसार गारटकर यांचा स्वत:चा व त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गारटकर दांपत्य सध्या पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहे. दरम्यान आम्हा दोघांचीही तब्बेत सध्या उत्तम असून केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत, असे स्वत: गारटकर यांनी सरकारनामाला सांगितले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख