राज्यमंत्री भरणेंनी जखमीला गाडी दिली अन्‌ स्वतः दुचाकीवरून घरी गेले 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तातडीने गाडी उपलब्ध करून दिल्यामुळे जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचविणे शक्‍य झाले. त्यामुळे जखमीला तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली.
Minister of State Bharne gave a car to the injured and went home on his own two-wheeler
Minister of State Bharne gave a car to the injured and went home on his own two-wheeler

वालचंदनगर (जि. पुणे) : वेळ सायंकाळी सव्वा सातची... ठिकाण इंदापूर (जि. पुणे) तालुक्‍यातील जंक्‍शनजवळ बारामती-इंदापूर राज्य महामार्ग... दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो...याचवेळी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची गाडी जवळून निघालेली असते. गर्दी पाहून भरणे गाडी थांबवतात...जखमीची अवस्था पाहून क्षणाचाही विलंब न करता तातडीने स्वत:ची गाडी अपघातील रुग्णासाठी देऊन दुचाकीवरुन घरी जातात. 

राज्यमंत्री भरणे यांनी तातडीने गाडी उपलब्ध करून दिल्यामुळे जखमीला तातडीने हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचविणे शक्‍य झाले. त्यामुळे जखमीला तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली. 

बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शुक्रवारी (ता. 31 जुलै) जंक्‍शनजवळ सव्वासातच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये विश्‍वनाथ सीताराम गोफणे (वय 50, रा. सोनगाव, ता. बारामती) हे जखमी होऊन रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते. अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. अंधारामुळे ये-जा करणारा प्रत्येक माणूस फक्त बघ्याची भूमिका घेत होता. याच दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे पुण्याहून भरणेवाडीला घरी चालले होते. 

रस्त्यालगतची गर्दी पाहून भरणे यांनी तातडीने गाडी थांबवली होती. रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेल्या व्यक्तीला पाहून क्षणाचाही विलंब न करता स्वत:ची गाडी चालकाला वळविण्यास सांगितले. जखमीची अवस्था पाहून त्यांनी तातडीने गाडी उपलब्ध करून दिली. चालकास जखमी व्यक्तीला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यास सांगितले. 

आपली मोटार जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी देऊन राज्यमंत्री भरणे स्वत: दुचाकीवरून घरी गेले. भरणे यांच्या तत्परतेमुळे एका जखमीला तातडीने रुग्णालयापर्यंत पोचवणे शक्‍य झाले. त्यांची अलिशान गाडी रुग्णवाहिका झाल्यामुळे जखमीवर तातडीने उपचार होण्यास मदत होणार आहे. 

दरम्यान, अपघातामध्ये विश्‍वनाथ सीताराम गोफणे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला आहे. भरणे यांचे चालक पप्पू शिंदे यांनी 15 मिनिटांमध्येच गाडी बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये पोचविली. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. भरणे यांच्या तत्परतेमुळे गोफणे यांना जीवदान मिळाले आहे. 

हेही वाचा : दूध दरवाढीसाठी महायुतीचे उद्या पंढरपुरात आंदोलन 

पंढरपूर : दुधाला योग्य दर मिळत नसल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरु आहे. दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी उद्या शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) भारतीय जनता पक्षासह मित्रपक्षाच्या महायुतीने राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. दूध दरवाढ आंदोलनाची सुरुवात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शनिवारी पंढरपुरातून केली जाणार आहे. 

संत नामदेव पायरीजवळ उद्या (शनिवारी) सकाळी विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी आज (ता. 31 जुलै) दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com