माळेगाव कारखाना अपघातातील जखमी एका कामगाराचा मृत्यू 

बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी (ता. 23) झालेल्या अपघातामधील एका जखमी कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला.
माळेगाव कारखाना अपघातातील जखमी एका कामगाराचा मृत्यू 
Malegaon Sugar factory accident injured One worker die

माळेगाव : बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये शनिवारी (ता. 23) झालेल्या अपघातामधील एका जखमी कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. शिवाजी भोसले (रा. 22 फाटा, खांडज, ता बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. 

या घटनेमुळे माळेगाव साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. 

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम सांगता झाल्यानंतर शनिवारी यंत्रसामग्रीची स्वच्छता करण्यात येत होती. त्या वेळी शनिवारी सकाळी हा अपघात झाला होता. एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन वायू तयार होऊन कामगार गुदमरले होते.

गंभीर जखमी असलेले कामगार जालिंदर भोसले, घनश्‍याम निंबाळकर, रामभाऊ येळे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत, तर उर्वरित कामगार बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

माळेगाव कारखान्याचे उपचार घेणारे जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे : रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी), घनश्‍याम निंबाळकर (माळशिरस), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी). 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in