Maharashtra government extend term of cooperative bodies for three months | Sarkarnama

पुणे जिल्ह्यातील या संस्थांमधील कारभाऱ्यांना मुदतवाढीचा बोनस 

गजेंद्र बडे 
गुरुवार, 18 जून 2020

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), सात सहकारी साखर कारखाने आणि चार खरेदी-विक्री संघासह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 236 विविध सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांना पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), सात सहकारी साखर कारखाने आणि चार खरेदी-विक्री संघासह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 236 विविध सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांना पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

यामुळे या संस्थांवरील सध्याचे कारभारीच आणखी किमान तीन महिने आपापल्या पदावर कायम राहणार आहेत. 

राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी मार्चच्या अखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा मुदतवाढ दिली होती. ही पहिली मुदतवाढ येत्या 30 जून रोजी संपत आहे.

मात्र या मुदतीतही या निवडणुका घेणे शक्‍य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या सर्व संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारकडून आज (ता. 18) करण्यात आलेली आहे. त्यानुसार या संस्थांवरील विद्यमान संचालक मंडळांना येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 

दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये सोमेश्वर (ता. बारामती) व छत्रपती (ता. इंदापूर), राजगड (ता. भोर), कर्मयोगी शंकरराव पाटील (ता. इंदापूर), घोडगंगा (ता. शिरूर), भीमा पाटस (ता. दौंड) आणि भीमाशंकर (ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. 

या शिवाय जिल्ह्यातील मावळ, आंबेगाव, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांच्या खरेदी-विक्री सहकारी संघांनाही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे. 

या बाजार समित्यांच्या निवडणुका केव्हा? 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात बाजार समित्यांच्या निवडणुकीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. कारण पुणे बाजार समितीची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपलेली आहे. मात्र या समितीवर सध्या प्रशासक आहे. या शिवाय जुन्नर, मंचर (ता. आंबेगाव), भोर, नीरा (ता. पुरंदर), खेड आणि मुळशी या सहा बाजार समित्यांची मुदत येत्या ऑक्‍टोबरमध्ये संपत आहे. मुदतवाढ सप्टेंबर अखेरपर्यंतच असल्याने या सात बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबतचा संभ्रम मात्र कायम राहणार आहे.  
 

पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यास कोरोनाची लागण 

पुणे : पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यास कोरोना विषाणूची लागणी झाल्याचे गुरुवारी (ता. 18) आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. 

महापालिकेतील महत्त्वाच्या सर्व बैठकांना त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्या सर्वच बैठकांना उपस्थित असलेले इतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेत्या ह्या मुंबईत रस्ता रुंदीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही उपस्थित होत्या. त्यामुळे या बैठकीलाही उपस्थित असलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांची चिंता वाढली आहे. 

विरोधी पक्षनेत्यास कोरोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल येताच महापालिकेतील त्यांचे दालन "सील' करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या दालनात ये-जा असणारे, तसेच कक्षात बैठकीत असलेले पदाधिकारी शोधून त्यांची कोविड तपासणी करण्याची सूचना दिल्या जात आहेत. 

जे लोकप्रतिनिधी आणि नागरिक गेल्या आठवडाभरापासून विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात येऊन गेले. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. पण, काहीजण आम्ही संपर्कात आलो नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीमध्ये भर पडत आहे. संबंधित आधिकाऱ्याची मात्र डोकेदुखी वाढली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख