पुणेकरांसाठी उद्यापासून लॉकडाउन शिथिल; किराणा मालासह भाज्याही मिळणार

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तो रोखण्यासाठी शहरात पुन्हा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउनमधून काही काळ पुणेकरांना उद्या खरेदीसाठी जास्त सवलत मिळणार आहे.
पुणेकरांसाठी उद्यापासून लॉकडाउन शिथिल; किराणा मालासह भाज्याही मिळणार
lockdown in pune will be relaxed from tommorrow says pmc commissioner

पुणे : शहरात किराणा माल, भाज्या, फळे तसेच चिकन, मटन, मासे अंडी विक्रीसाठी उद्यापासून (ता.१९) परवानगी मिळणार आहे. लॉकडाउन शिथिल होत असल्याचा हा पहिलाच दिवस आहे. यातच उद्या रविवार असल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे उद्यापुरती दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत खुली राहतील, अशी महापालिकेने दिली आहे. 

दुकाने ही 20, 21, 22 आणि 23 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी  12 या वेळेतच उघडी राहतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे 14 ते 23 जुलै या कालावधीत पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यामध्ये प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केला. पुणे महापालिका क्षेत्रात आयुक्त विक्रमकुमार यांनी 12 जुलैला काढलेल्या आदेशात पहिले पाच दिवस म्हणजे 18 जुलैपर्यंत लॉकडाउन कडक असेल, असे म्हटले होते. या काळात फक्त दूध आणि वृत्तपत्र वितरणासाठी परवानगी देण्यात आली होती. तसेच, औषधांची दुकानेही उघडी ठेवण्यासही परवानगी होती. 

प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाउनमधील पहिला टप्पा आज रात्री बारा वाजता संपेल. दुसरा टप्पा उद्यापासून (ता.19 ) सुरू होत आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून 23 जुलैपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ठोक व किरकोळ दुकाने (किराणाभुसार मालाची) तसेच अडते, भाजी मार्केट, फळ बाजार उद्यापासून सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान उघडी राहणार आहेत, असे म्हटले होते. परंतु, उद्या लॉकडाउन शिथिल होण्याचा पहिलाच दिवस आणि रविवार यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश काढून फक्त उद्या (ता. 19) दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, 20, 21, 22, 23 जुलैला  ही दुकाने सकाळी  8 ते दुपारी 12 दरम्यानच उघडी राहणार आहेत. 

ई- कॉमर्सलाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्टच्या माध्यमातून नागरिकांना वस्तू घरपोच मिळणार आहेत, असे महापालिकेने स्पष्ट  केले आहे. मात्र, इतर सर्व दुकाने, व्यवसाय, वाईन शॉप, सलून आदी सर्व बंद राहणार आहे. शहरातील वाहतूकही बंदच असणार आहे. कामाशिवाय घराबाहेर पडणाऱया नागरिकांवर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. लॉकडाउनच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी रिक्षा आणि कॅब सुरू असतील. तसेच पीएमपीचीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांच्या वाहतुकीसाठी बससेवा सुरू आहे. त्यात सुमारे 125 बसद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू आहे, असे पीएमपीने स्पष्ट केले आहे.

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in