पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यास कोरोनाची लागण 

विरोधी पक्षनेत्या ह्या मुंबईत रस्ता रुंदीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही उपस्थित होत्या. त्यामुळे या बैठकीलाही उपस्थित असलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांची चिंता वाढली आहे.
पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यास कोरोनाची लागण 
Leader of Opposition in Pune Municipal Corporation infected with corona

पुणे : पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यास कोरोना विषाणूची लागणी झाल्याचे गुरुवारी (ता. 18) आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. 

महापालिकेतील महत्त्वाच्या सर्व बैठकांना त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे त्या सर्वच बैठकांना उपस्थित असलेले इतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

दरम्यान, विरोधी पक्षनेत्या ह्या मुंबईत रस्ता रुंदीकरणासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीलाही उपस्थित होत्या. त्यामुळे या बैठकीलाही उपस्थित असलेले अधिकारी आणि पदाधिकारी यांची चिंता वाढली आहे. 

विरोधी पक्षनेत्यास कोरोनाची लागण झाल्याचा तपासणी अहवाल येताच महापालिकेतील त्यांचे दालन "सील' करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या दालनात ये-जा असणारे, तसेच कक्षात बैठकीत असलेले पदाधिकारी शोधून त्यांची कोविड तपासणी करण्याची सूचना दिल्या जात आहेत. 

जे लोकप्रतिनिधी आणि नागरिक गेल्या आठवडाभरापासून विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात येऊन गेले. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. पण, काहीजण आम्ही संपर्कात आलो नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीमध्ये भर पडत आहे. संबंधित आधिकाऱ्याची मात्र डोकेदुखी वाढली आहे. 

पुण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या प्रश्‍नावरून गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबई येथे बैठका होत आहेत. या दोन्ही बैठकांसह आढावा बैठकांनाही विरोधी पक्षनेत्या हजर होत्या. या बैठकांना त्यांचे पतीही हजेरी लावत असतात. त्यानंतर महापालिकेतील बहुतांशी बैठका आणि छोटेखानी कार्यक्रमांमध्ये त्या दिसत होत्या. त्यामुळे गेल्या दहा दिवसांतील बैठकांना उपस्थितीत राहिलेले सर्वच पदाधिकारी-अधिकारी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. 


या डॅाक्टरांनी कोरोनाग्रस्तांसाठी घेतला असा निर्णय...

नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर अनेकांनी त्याची धास्ती घेतली. यामध्ये अनेक शासकीय संस्थांतील डॉक्‍टर रजेवर गेले. बहुसंख्या खासगी रुग्णालये डॉक्‍टरांनी बंद केली. नियमित रुग्णांनाही उपचार मिळेनासे झाले.

कोरोनाचा हा सामाजिक परिणाम होता. मात्र या कालावधीत अनेक डॉक्‍टरांनी आपल्या व्यावसायाशी प्रामाणिक राहून वेगळे उपक्रमदेखील राबविले. येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजय धुर्जड यांनी स्वतः महापालिकेशी संपर्क साधून आपले रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी उपलब्ध केले. त्यांचे हे पाऊल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

गेले काही दिवस नाशिक शहरात "कोविड- 19'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिककरांच्या मदतीसाठी येथील सुदर्शन हॉस्पिटलचे संचालक डॉ. धुर्जड पुढे आले असून, त्यांनी स्वयंस्फूर्तीने महापालिकेला अर्ज करून हे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देऊन घोषित करावे, अशी विनंती केली गेली. अशा प्रकारचे कदाचित देशातील हे पहिलेच हॉस्पिटल असावे.

गेले काही दिवस यासंदर्भात त्यांनी विविध समव्यावसायिक तसेच संस्थांशी संपर्क साधून कोरोनावरील उपचारासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली होती. प्रारंभी शहरात कोरोनाचा फारसा संसर्ग नव्हता. मात्र आता त्याचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. शासन, महापालिकेच्या व्यवस्थाही अपुऱ्या ठरत आहेत. हे लक्षात आल्यावर डॉ. धुर्जड यांनी हे पाऊल उचलले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in