राष्ट्रवादी अन् भाजपचे शहराध्यक्ष आमने सामने; राज्य शासनाच्या मदतीवरून जुंपली

राज्य सरकारने पालिकेला 140 कोटींची मदतकेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
राष्ट्रवादी अन् भाजपचे शहराध्यक्ष आमने सामने; राज्य शासनाच्या मदतीवरून जुंपली
Jagdish Mulik slams Prashant Jagtap over state government help to PMC

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे तथ्य नसलेली माहिती देऊन पुणेकांची दिशाभूल करत आहेत. कोणताही अभ्यास न करता अर्धवत माहितीच्या आधारे ते बोलत आहेत. महापालिकेने मागणी करून राज्य सरकारने आर्थिक मदत केली नसल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुक्रवारी केली. (Jagdish Mulik slams Prashant Jagtap over state government help to PMC)

पुण्यातील सत्ताधारी किंवा प्रशासनाने आजपर्यंत राज्य सरकारकडे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आर्थिक मदतीची मागणीच केली नाही. त्यामुळे राज्य शासनाने मदत दिली नाही. मागणी केल्यास ती मिळवून देऊ, असे वक्तव्य प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. तसेच राज्य सरकारने पालिकेला 140 कोटींची मदत केल्याचा दावाही जगताप यांनी केला आहे. त्यावरून मुळीक यांनी जगतापांना धारेवर धरले. 

जगताप यांना प्रत्युत्तर देताना मुळीक यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्य शासनाला लिहिले पत्र दाखविले. मुळीक म्हणाले त्यांच्या दाव्यात तथ्य नाही. ससून रूग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट, बारामती शासकीय महाविद्यालय, येरवड्यातील प्रादेशिक मनोरूग्णालय या आस्थापनांना शासनाने मदत केली आहे. ही मदत महापालिकेला केलेली नाही. कोणताही अभ्यास न करता अर्धवट माहितीवर विधाने करून जगताप पुणेकरांची दिशाभूल करण्याची त्यांची जुनी सवय आहे, अशी टीका मुळीक यांनी केली. 

आयुक्त गायकवाड यांनी १२ जून २०२० रोजी राज्य शासनाला पत्र लिहिले होते. कोरोना नियंत्रणासाठी १५० ते २०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये वैद्यकीय उपचारांची साधने, मास्क खरेदी, विलगीकरण कक्षात विविध सेवा पुरविणे, नवीन रूग्णालये उभारणे आदी कामांचा समावेश होता. पण हा निधी मिळालेला नाही, असे मुळीक यांनी सांगितले. जगताप यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आता किमान २०० कोटी रूपयांचा निधी महापालिका उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुणेकरांची जाहीर माफी मागावी, असे आव्हानही मुळीक यांनी जगतापांना दिले.

राज्य सरकारकडून महापालिकेला सापत्न वागणूक दिली जात आहे. कोरोना काळात आर्थिक मदत तर केलीच नाही, उलट मागील दोन वर्षीचा २५० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही महापालिकेला दिले नाही. हा निधीही तातडीने द्यावा, अशी मागणी मुळीक यांनी केली.

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in