हवेलीसाठी स्वतंत्र बाजार समिती : अजित पवारांचा भाजपला दुसऱ्यांदा धक्का 
Independent Market Committee for Haveli: Ajit Pawar's second blow to BJP

हवेलीसाठी स्वतंत्र बाजार समिती : अजित पवारांचा भाजपला दुसऱ्यांदा धक्का 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच या बदलास मान्यता दिली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत आठवडभरात दुसऱ्यांदा भाजपचा निर्णय फिरवला आहे. या अगोदर पुणे महापालिकेतील भाजपचा रस्ता रुंदीकरण आणि टीडीआरसंदर्भातील निर्णय बदलला आहे.

लोणी काळभोर (पुणे) : पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यानुसार पूर्वीप्रमाणे हवेली व मुळशी तालुक्‍यांसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्व येणार आहेत. या निर्णयामुळे हवेलीकरांना तब्बल 15 वर्षांनंतर हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच या बदलास मान्यता दिली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड देत आठवडभरात दुसऱ्यांदा भाजपचा निर्णय फिरवला आहे. या अगोदर पुणे महापालिकेतील भाजपचा रस्ता रुंदीकरण आणि टीडीआरसंदर्भातील निर्णय बदलला आहे. 

सुमारे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हवेली व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करण्यात आले होते. त्या दोन्ही बाजार समित्या एक करून पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली होती.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करावे. पुर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावे, अशी मागणी केली होती. याबाबत तीन महिन्यांपूर्वी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीतच पाटील यांनी बदलाचे संकेत दिले होते. 

राज्यात प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र बाजार समिती आहे. राज्य सरकारने सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी हवेली व मुळशी या तालुक्‍यांवर अन्याय केला. दोन्ही तालुक्‍यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समिती एकत्रित केल्या. तसेच, गेल्या 15 वर्षांपासून या बाजार समितीवर सरकारी प्रशासक नेमला जात होता. हा अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालयात तीन महिन्यांपूर्वी आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. 

त्या वेळी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून पूर्वीप्रमाणेच हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची विनंती केली होती. याबाबत चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालून सहकार मंत्र्यांना तशा सूचना केल्या, असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. 

या निर्णयामुळे गुलटेकडी (पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात फक्त हवेली तालुक्‍याचीच असणार आहे. येत्या काही दिवसांत हवेलीसाठी "हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती' या नावाने बाजार समिती अस्तित्वात येणार आहे, असे आमदार पवार म्हणाले. 

तब्बळ सोळा वर्षांनंतर हवेलीकरांच्या हाती येणार सूत्रे 

पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द केल्यानंतर हवेली व मुळशी या तालुक्‍यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत. हवेली बाजार समितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे हवेली कृषी बाजार समितीची सत्ता सूत्रे तब्बल सोळा वर्षांनंतर हवेलीकरांच्या हाती येणार आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in