इंदापूरचा पुढचा आमदार काँग्रेसचाच असेल  ः नाना पटोले

आमच्या पक्षाची दारे सगळ्यासाठी उघडी आहेत.
Indapur's next MLA will be from Congress : Nana Patole
Indapur's next MLA will be from Congress : Nana Patole

इंदापूर (जि. पुणे) :  इंदापूर विधानसभा मतदारसंघातील गावागावांत काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पुढचा इंदापूरचा आमदार हा काँग्रेस पक्षाचाच निवडून येणार आहे, हे मी तुम्हाला आताच सांगतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंदापुरात केले. या वक्तव्यामुळे पटोलेंचा रोख माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तरी नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी पटोले आज पंढरपूरला निघाले होते. त्यावेळी इंदापुरात थांबल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.  

आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहे, संधीसाधूंसाठी नाही. आमच्या पक्षाची दारे सगळ्यासाठी उघडी आहेत. सत्तेसाठी नव्हे, तर पक्षासाठी ज्याला काम करायचे आहे, अशा लोकांसाठी आमची दारे उघडी आहेत. आगामी 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. काँग्रेस हाच सत्तेतला प्रमुख पक्ष राहणार आहे, असा दावाही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी बोलताना केला.

पटोले म्हणाले की, राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना, जेव्हा पोटनिवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यायच्या, त्यावेळची देवेंद्र फडणवीस यांची भाषणे काढून बघा. जनतेने त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करून टाकलाय. खोटी आश्वासन देणं आणि लोकांची दिशाभूल करणे, एवढाच एकच फडणवीस यांचा धंदा आहे. 

भाजपमधील नेते सत्ताजिवी लोक आहेत, त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. आज राज्यात आणि देशात कोरोनाची स्थिती भयावह असताना आणि अनेकांचा जीव जात असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे प्रचारजिवी आहेत. त्यांनी देशातील प्रत्येक माणसाच्या जीवाची काळजी करायला पाहिजे. परंतु तसं न करता देशातील पाच राज्यात ज्या निवडणुका सुरू आहेत, तेथे ते प्रचार करत आहेत. असे प्रचारजिवी पंतप्रधान देशाने प्रथमच पाहिले. देशाला विकण्याशिवाय दुसरं काम भाजप करू शकत नाही. त्यामुळे पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला पाहिजे. जेणेकरून भाजपची अक्कल ठिकाणावर आली पाहिजे, यासाठीच जनतेला आवाहन करण्यासाठी मी पंढरपुरात जात आहे, असंही पटोले इंदापुरात म्हणाले. 

दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची चिन्हे आहेत. कारण, इंदापूर मतदारसंघातून काँग्रेसचा आमदार निवडून आणण्यासाठी हा मतदारसंघ जागा वाटपात प्रथम पक्षाला सोडून घ्यावा लागणार आहे. पण, त्याच एका मुद्यावरून हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला रामराम केला आहे. कारण, या ठिकाणी विद्यमान आमदार हा राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com