कंटेनमेंट झोन वाघोलीत घटले; पण हवेली तालुक्‍यात वाढले 

वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्‍यात सहा जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 झाली आहे.
 Increase in containment zone in Haveli taluka
Increase in containment zone in Haveli taluka

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे हवेली तालुक्‍यातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेनमेंट झोन) वाढ झाली आहे. वाघोली परिसरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या घटली आहे. परंतु हवेली तालुक्‍यात सहा जून रोजी प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 31 होती, ती आता 45 झाली आहे. 

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र 

मांजरी बुद्रूक- महादेवनगर, मांजरी बुद्रूक- शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, नन्हे- नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्‍स, कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद, मांजरी बुद्रूक-भंडलकरनगर, पिसोळी-गगन रेसिडेन्सी, मांजरी खुर्द- पवार वस्ती, कारेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बुद्रूक -घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बॅंक परिसर), धूत कंपनी परिसर,

मांजरी बुद्रूक-भापकर मळा, कदमवाकवस्ती- चांदणे वस्ती, मांजरी बुद्रूक- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी), वाघोली- उबाळेनगर, मांजरी बुद्रूक- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग, मांजरी बुद्रूक- आनाजी वस्ती, नन्हे- सिध्दीविनायक अंगण सोसायटी (इ-विंग).

 कोंढवे धावडे- खडकवासला एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी, लोणीकंद- सद्‌गुरू पार्क (तुळापूर फाटा), वाघोली-रोझवूड पार्क (आव्हाळवाडी रोड), रहाटवडे, उरळी कांचन- बी. शिर्के शाळा परिसर, लोणी काळभोर- बाजार मळा, वडाचीवाडी, पिसोळी-ए.आर.व्ही. न्यू टाऊन बिल्डींग ब्रिक्‍स कॉलेज परिसर, उरुळी कांचन- आश्रमरोड, मांजरी बुद्रूक- मांजरी फार्म. देहूगाव- चव्हाणनगर नंबर-2 व विठ्ठलवाडी (बोत्रे आळी), नांदेड- आशिष प्लाझा जिजाईनगर, नन्हे- साई पूरम सोसायटी, उरुळी कांचन- तेज प्लैटिनम सोसायटी. 

मांजरी खु-इंदिरानगर, खडकवासला-डी.आय.टी. गिरीनगर (लष्कर हद्द), वडकी गावठाण, देहू- माळवाडी (विघ्नहर्ता सोसायटी), औताडेवाडी, नन्हे- प्रथमेश सोसायटी मानाजीनगर, खडकवासला- संत रोहिदास नगर गावठाण गल्ली क्र. 1, वाघोली- काळे ओढा, मांजरी बुद्रूक- वृंदावन हाईट्‌स महादेव नगर, गुजर निंबाळकरवाडी- सोपानकाका नगर. 
 

क्वारंटाइन कालावधी 14 दिवसांचा 

हवेली तालुक्‍यातील ग्रामीण भागात इतर भागातून, शहर अथवा जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायत कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांना कळविणे आवश्‍यक आहे. 14 दिवस होम क्वारंटाइन राहणे आवश्‍यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा हवेलीचे उपविभागीय अधिकारी बारवकर यांनी दिला आहे. 

ग्रामीण भागात एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये किमान 28 दिवस रुग्ण न आढळल्यास त्या परिसराला कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात येते. त्यामुळे ही संख्या वाढल्याचे दिसत आहे. परंतु रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तेथे वैद्यकीय तपासणी आणि औषध फवारणी करण्यात येत आहे. मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. 
- सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com