जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर गृहमंत्री नतमस्तक 

विराज जगताप या तरुणाच्या खून प्रकरणाला जातीय वळण देऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नतमस्तक झाले. संपूर्ण गावाला सोबत घेऊन जातीय वाद टाळण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांची भेट घेऊन देशमुख यांनी त्यांचे सांत्वन केले.
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर गृहमंत्री नतमस्तक 
Home Minister visits Viraj Jagtap's family

पिंपरी-चिंचवड : विराज जगताप या तरुणाच्या खून प्रकरणाला जातीय वळण देऊन राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या विराजच्या आजीसमोर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नतमस्तक झाले. संपूर्ण गावाला सोबत घेऊन जातीय वाद टाळण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांची भेट घेऊन देशमुख यांनी त्यांचे सांत्वन केले. 

पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप तरुणाची सहा जणांनी हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही संदेश, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक असलेल्या विराजच्या आजी सुभद्राबाई जगताप या स्वतःहून पुढे आल्या. "वैयक्तिक दु:ख विसरून जातीय सौहार्द राखण्यासाठी पुढे आलेल्या सुभद्राबाई जगताप यांच्याकडून सर्वांनी हे शिकण्यासारखं आहे.' 

जगताप कुटुंबाचे सांत्वन करताना शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा पहिला हप्ता 4 लाख 12 बारा हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विराजच्या आई रेश्‍मा जगताप यांच्याकडे सुपूर्त केला. 

गृहमंत्री देशमुख म्हणाले, "या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, विराजच्या कुटुंबीयांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. सुभद्राबाईंनी समोर येऊन संपूर्ण गावाशी संवाद साधला. सर्व गावाची एकत्र बैठक घेतली. माझा नातू गेला आहे, तो काही परत येणार नाही, परंतु तुम्ही वाईट पोस्ट टाकू नका, यातील दोन जातीमध्ये वाद निर्माण होईल, असं आवाहन त्यांनी केले होते. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले नाही. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी संयम दाखविला.'' 

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राची हीच ताकद आहे. कोणत्याही प्रकारचा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना येथे थारा मिळत नाही. हेच जगताप कुटुंबीयांनी अधोरेखित केले आहे. 

जळगावमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण पुन्हा बेपत्ता 

जळगाव : जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील "कोविड' रुग्णालयातून 80 वर्षीय संशयित रुग्ण बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी याच रुग्णालयातून 80 वर्षीय महिला बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह शौचालयात सापडला होता. आज पुन्हा संशयित वृद्ध रुग्ण बेपत्ता झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. 

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात संशयित व्यक्तीवरही उपचार करण्यात येत आहेत. नगरदेवळा येथील 82 वर्षीय वृद्ध कोविड संशयित होते. त्यांना उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आले आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात वृद्ध रुग्ण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे अकबर पटेल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की या प्रकरणी हरविल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी तपास पीएसआय पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. नगरदेवळा येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्या ठिकाणीही तपास करण्यात येत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in