पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले उच्चांकी 62 कोरोना रुग्ण 

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 7) एकाच दिवसात सुमारे 62 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. या सर्वांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले उच्चांकी 62 कोरोना रुग्ण 
The highest number of 62 corona patients found in Pimpri-Chinchwad

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. 7) एकाच दिवसात सुमारे 62 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. या सर्वांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 32 वर जाऊन पोचली आहे. यातील 18 जण हे पुणे आणि बाहेरील रुग्ण होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये उपचार घेत होते. 

रविवारी आढळलेल्या 62 जणांमध्ये 32 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरी, जुनी सांगवी, पाटीलनगर- चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर- भोसरी, पवनानगर येथील व्यक्तींचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी एकाच दिवशी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 62 ने वाढली आहे. ती आजपर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येतील उच्चांक आहे. यामुळे शहरात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 789 वर जाऊन पोचला आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात पुणे आणि इतर ठिकाणचे 123 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील 63 जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 42 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील एकूण 447 जण बरे झाले आहेत. तर, 324 जणांवर उपचार सुरू आहेत. 

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली 7881 

पुणे : कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या 209 अत्यवस्थ रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 
पुण्यात गेल्या 24 तासांत केलेल्या नमुने तपासणी अहवालातील 159 जणांना कोरोनाचे निदान झाले. 

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात 119, ससूनमध्ये 6 तर खासगी रुग्णालयात 34 जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 881 झाली आहे. सध्या विविध रुग्णालयांत 2 हजार 484 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 209 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 50 जणांना उपचारासाठी व्हेंटिलेटर ठेवले आहे. 

शहरात 24 तासांत आणखीन 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये भुसावळ येथील 37 वर्षीय रुग्णाचा, सोलापूर येथील 48 वर्षीय खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अन्य सहा जण हे पुणे शहर हद्दीतील असून, 36 ते 83 या वयोगटातील तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, येरवडा, नारायण पेठ, लष्कर परिसरातील ते होते. यातील बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयविकार होता, असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in