पुणेकरांनो सावधान! कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्यसुविधा तुटपुंज्या

राज्यात मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधाच नसल्याचे समोर आले आहे.
healthcare facilities in pune are not adequate for corona transmission
healthcare facilities in pune are not adequate for corona transmission

मुंबई : पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्यसुविधा नसल्याची चिंता केंद्र सरकारच्या कोरोना पथकाने व्यक्त केली आहे. दोन महिन्यांपूर्वी आरोग्यसेवांसाठी धडपडणाऱ्या मुंबई महापालिकेप्रमाणेच पुण्याची सद्य:स्थिती असल्याचे केंद्रीय पथकाचे मत आहे. 

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्राणवायू असलेल्या खाटा किती, व्हेंटिलेटरची सोय किती रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते, याची चौकशीही केंद्र सरकारने केली आहे. ससून रुग्णालयात २ हजार ते २ हजार २०० खाटांचे कोविड विशेष रुग्णालय उभारले जाणार होते. मात्र, तेथे २०० कोविड रुग्णांवर उपचार होत असल्याची माहिती केंद्र सरकारला समजली आहे. म्हणूनच लॉकडाउनमध्ये आरोग्यसेवा उभारायच्या असतात याचे स्मरण केंद्र सरकारने करुन दिले आहे. त्यातच पुण्यातील बहुतांश खासगी रुग्णालये कोविड-१९ रुग्णांना दाखल करून घेत नसल्याने रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करणे हे येत्या काही दिवसांत आव्हानात्मक ठरणार आहे. 

मुंबईत कोरोनासाठी जम्बो रुग्णालये उभारण्यात आले आहे. हा अनुभव लक्षात घेता पुण्यातही असेच पाऊल उचलायला हवे होते, असे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले आहे. याबाबतच्या प्रशासकीय पातळीवर झालेल्या दिरंगाईबद्दल पथकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. अशा स्थितीत बालेवाडी संकुलासारख्या जागांवर मुंबईप्रमाणेच रुग्णालये का उभारली नाहीत, असा प्रश्नही  विचारण्यात आला आहे. 

कोरोनासंदर्भात पुण्यातील तयारीचा आढावा घेऊ, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: लक्ष द्यावे असे नमूद केले. यामुळे आगामी काळात दिल्ली राज्याप्रमाणे शहा स्वत: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये लक्ष घालतील, असा अंदाज आहे. 

मुंबईतील कोरोना साथीला तोंड देण्यासाठी आता यंत्रणा उभारण्यात आली आहे. ठाणे शहर मोठे असल्याने तेथेही रुग्ण व्यवस्थापन होणे शक्य आहे मात्र, वसई, विरार, नालासोपारा अशा मुंबईलगतच्या भागात कोणतीही सोय नसल्याने धोका वाढत आहे. या विस्तारलेल्या शहरांत आरोग्यसुविधांचा प्रचंड अभाव असल्याने या परिसरात काही वेगळ्या उपाययोजना करण्याबाबतही विचार सुरू  आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com