हवेलीकरांचे स्वप्न १६ वर्षांनंतर पूर्ण होणार : पुणे बाजार समितीच्या विभाजनाची अधिकृत घोषणा 

बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक होण्याचे मागील सोळा वर्षांपासूनचे हवेलीकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
Havelikar's dream will come true after 16 years: Official announcement of division of Pune Bazar Samiti
Havelikar's dream will come true after 16 years: Official announcement of division of Pune Bazar Samiti

लोणी काळभोर (जि. पुणे)  ः पुण्यातील गुलटेकडी येथील पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन झाल्याची अधिकृत घोषणा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बुधवारी (ता. ९ सप्टेंबर) केली. या घोषणेमुळे आगामी काळात हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक होण्याचे मागील सोळा वर्षांपासूनचे हवेलीकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन व्हावे, यासाठी आमदार अशोक पवार व आमदार संग्राम थोपटे यांनी मागील आठ महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनामुळे यापुढील काळात गुलटेकडी येथूनच पूर्वीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हाकला जाणार आहे. 

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील परिसर, पुणे, खडकी, देहूरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्‍यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे हवेली कृषी बाजार समितीची सूत्रे तब्बल सोळा वर्षानंतर हवेलीकरांच्या हाती येणार आहेत. 

गुलटेकडी (पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमितता असल्याच्या कारणावरून सोळा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करुन बाजार समितीवर प्रशासक नेमला होता. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात तब्बल दहा वर्षे विविध कारणे पुढे करत प्रशासक कारभार पाहत होता.

त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात हवेली व मुळशी बाजार समितीचे एकत्रीकरण करून पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली होती.  त्यास हवेली व मुळशी तालुक्यातील जनतेचा विरोध होता. 

दरम्यान, वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होताच, आमदार अशोक पवार व संग्राम थोपटे यांनी पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन रद्द करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली होती. त्यानुसार अजित पवार यांनी हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत आमदार अशोक पवार म्हणाले, हवेली तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी हवेलीसाठी पूहर्वीसारखीच स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, यासाठी आग्रह धरला होता. राज्यात प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात असताना फडणवीस सरकारने मात्र स्वतःच्या फायद्यासाठी हवेली व मुळशी या तालुक्यांवर अन्याय करून दोन्ही तालुक्यांच्या दोन वेगवेगळ्या बाजार समित्या एकत्रीत केल्या होत्या.

हवेलीकरांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालयात तीन महिन्यांपूर्वी आमदार संग्राम थोपटे यांच्या समवेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची या संदर्भात भेट घेतली. त्यांच्याकडे हवेली व मुळशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे स्वतंत्र  अस्तित्व पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याची विनंती केली होती. यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाठींबा दिल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे प्रादेशिक बाजार समितीवर मागील सोळा वर्षांपासून प्रशासक काम पाहत आहे. यामुळे हवेली तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे बाजार समितीवर अधिक काळ प्रशासक न राहता समिती लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती यावी, यासाठी बाजार समितीची निवडणूक लवकरात लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com