हवेली तालुक्यात 'हे' आहेत नवीन कंटन्मेंट झोन - haveli tehsil containment zones announced by administration | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

हवेली तालुक्यात 'हे' आहेत नवीन कंटन्मेंट झोन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 जून 2020

हवेली तालुक्यातील नवीन सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानुसार प्रतिबंधित क्षेत्रांची ही सुधारित यादी तयार करण्यात आली आहे.  

पुणे : हवेली तालुक्यातील नवीन कंटेन्मेंट झोन म्हणजेच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र मंगळवारी जाहीर करण्यात आले आहेत. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी याबाबत आदेश  काढले केले आहेत.  तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गाच्या सद्य:स्थितीचा विचार करुन प्रशासनाने ही यादी तयार केली आहे. 

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची यादी :

मांजरी बु.- महादेवनगर,  वाघोली- आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, नऱ्हे- गोकुळनगर, वाघोली- गणेश पार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीन सिटी फेज-१ ए, मांजरी बु.- शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, वाघोली - झेड रेसिडन्सी, नऱ्हे - नवदिप सोसायटी ते देवरी कॉम्प्लेक्स, वाघोली-गणेशनगर,  कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद नगर, नऱ्हे- कंजारवस्ती कृष्णाईनगर,  आळंदी म्हातोबा- पानमळा, मांजरी बु.- भंडलकरनगर, वाघोली-(दत्तमंदिर परिसर) काळुबाईनगर, पिसोळी- गगन रेसिडेन्सी, मांजरी खु.-पवार वस्ती, केरेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बु.-घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बँक परिसर), धुत कंपनी परिसर, मांजरी बु.- भापकर मळा, कदमवाकवस्ती-चांदणे वस्ती, मांजरी बु.- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी), वाघोली- उबाळेनगर, मांजरी बु.- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती- तुपे प्लॉटींग, मांजरी बु.- आनाजी वस्ती, नन्हे- सिध्दीविनायक अंगण सोसायटी (इ-विंग), कोंढवे धावडे - खडकबाग एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी, लोणीकंद- सद्गुरु पार्क (तुळापुर फाटा), वाघोली- रोझवुड पार्क (आव्हाळवाडी रोड), रहाटवडे. 

कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज

बारामती : कोरोनाने आर्थिक संकटात असलेल्या बारामतीकरांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे बारामतीकर त्रस्त झाले आहेत.  वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अनेक बारामतीकरांवर काल संध्याकाळी आणि आज पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेकांना पाचशे रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरावी लागली. काल संध्याकाळी व आज सकाळी पोलिसांनी फौजफाटा उभा करुन वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. परवाना नसलेल्यांवर पोलिसांनी दंडाची कारवाई केली. पोलिसांच्या कामाला किंवा कारवाईला कोणाचाच आक्षेप नाही.  मात्र पोलिसांनी कारवाईची जी वेळ निवडली आहे ती योग्य नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्यासही वेळ दिली नसल्याचा आरोप काही वाहनचालकांनी केला. विशेष म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना जेवण नेऊन देण्यासाठी मदत केली त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली, असे काहींनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख