गिरीश बापटांचा स्वतःच्याच ट्विटला रिप्लाय, ‘खूप छान भाऊ...’ 

समाजाच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर आता सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रभावीपणे करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हॉटस ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, हॅलो आदी ॲपचा वापर खुबीने करत आहेत.
गिरीश बापटांचा स्वतःच्याच ट्विटला रिप्लाय, ‘खूप छान भाऊ...’ 
Girish Bapat replies to his own tweet, 'Very nice Bhau ...' :

पुणे : समाजाच्या सातत्याने संपर्कात राहण्यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर आता सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते प्रभावीपणे करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, व्हॉटस ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, हॅलो आदी ॲपचा वापर खुबीने करत आहेत. 

या समाज माध्यमांवर कोणाला किती प्रतिक्रिया, लाइक्स मिळतात, याचीही स्पर्धा राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असते. यावर त्यांचे समाज मनातील स्थानाची चाचपणी देखील असते. ही समाज माध्यमे नेत्यांचे पगारी कार्यकर्ते हाताळत असतात, तर काही तरुण नेते स्वतः हाताळत असतात. आपण केलेल्या पोस्टलाच आपलीच प्रतिक्रिया दिल्याचा विनोदी प्रकार समोर आला आहे. 

पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार गिरीश बापट यांनी शहरातील रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावण्या संदर्भात शहर भाजपच्या शिष्टमंडळासह पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या भेटीच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांची कात्रणे बापट यांच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर प्रसिद्ध झाली. यावर बापट यांनी स्वतःच्याच ट्विटला स्वतःच ‘‘खूप छान भाऊ’’ असा रिप्लाय दिला आहे.  त्याची पुणे शहरात शुक्रवारी चांगलीच चर्चा रंगली होती.

खासदार गिरीश बापट स्वतः ट्विटर हॅडल आॅपरेट करत नसल्याचे समोर आले आहे. त्यांचा पगारी कर्मचारी हे हॅंडल आॅपरेट करत आहे. त्या कर्मचाऱ्याकडून चुकीने हा रिप्लाय दिला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून ट्विटर हॅडलवरील हा रिप्लाय डिलिट करण्यात आला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in