बापटांकडून पीएम केअर्सला निधी; पुणे महापालिकेस रुपयाचीही मदत नाही - Funding to PM Cares from Girish Bapat; Pune Municipal Corporation does not even have the help of rupee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

बापटांकडून पीएम केअर्सला निधी; पुणे महापालिकेस रुपयाचीही मदत नाही

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 21 जुलै 2020

 पुणे शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण अकरा आमदारांनी आपल्या विकास निधीतून १ कोटी ७९ लाख रुपये कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेला दिले आहेत. पण, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट तसेच, प्रकाश जावडेकर यांनी पुणे महापालिकेस एक रुपयाही उपलब्ध करून दिलेला नाही.

पुणे : पुणे शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण अकरा आमदारांनी आपल्या विकास निधीतून १ कोटी ७९ लाख रुपये कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेला दिले आहेत. पण, भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट तसेच, प्रकाश जावडेकर यांनी पुणे महापालिकेस एक रुपयाही उपलब्ध करून दिलेला नाही, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आकडेवारी जाहीर करून त्यांनी ही माहिती पुढे आणली आहे. 

खासदार गिरीश बापट यांना पत्रकारांनी सोमवारी विचारले होते की लॉकडाउन का केला. त्या वेळी त्यांनी या बाबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच विचारा, त्यांनीच लॉकडाउन लागू केला आहे, असे म्हटले होते. त्यानंतर काही वेळातच कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा व नियोजन समितीमधील (डिपीडीसी) आकडेवारी जाहीर करत बापट यांच्यावर पलटवार केला आहे. 

कोरोनावर उपचार करण्यासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमदार निधीतून प्रत्येकी २० लाख तर, शरद रणपिसे यांनी १२ लाख, भीमराव तापकीर यांनी १० लाख रुपये तर, तत्कालीन आमदार अनंत गाडगीळ यांनी ७ लाख रुपये महापालिकेला डिपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. राज्य सरकारने ३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे डिपीडीसीच्या माध्यमातून ४ कोटी ७९ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत, असे आकडेवारीतून उघड झाले आहे. 

खासदार गिरीश बापट आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या विकास निधीतील रक्कम पीएम केअर फंडला दिली आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही त्यांनी महापालिकेला निधी का दिला नाही. पुणे महापालिका, पालिकेचे पदाधिकारी यांच्यावर त्यांचा विश्वास नाही का, असा प्रश्न महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दीपाली धुमाळ, नगरसेवक महेंद्र पठारे, पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी एका पत्राद्वारे उपस्थित केला आहे. 

महापालिकेतील सत्ताधारी शहरात कोरोना वाढत असताना काय करीत आहेत. राज्य सरकारने तरी ३ कोटी रुपये दिले आहेत. तरीही भाजपचे खासदार राज्य सरकारवर आरोप करीत आहेत. त्यांनी पुणे शहरासाठी खासदार निधीतून रक्कम उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती, असेही धुमाळ, पठारे, बालगुडे यांनी म्हटले आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख