वाळूट्रकसाठी नायब तहसीलदारला दिले साडेचार लाख : ट्रकमालकांची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती - Four and a half lakh given to Deputy Tehsildar for sand truck: Information of truck owners through affidavit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

वाळूट्रकसाठी नायब तहसीलदारला दिले साडेचार लाख : ट्रकमालकांची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती

भरत पचंगे 
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून 14 जुलै रोजी वाळूचे चार ट्रक पळविण्याच्या प्रकरणात ट्‌विस्ट निर्माण झाले. यातील तीन ट्रक सोडण्यासाठी नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांना प्रतिट्रक दीड लाख रुपये म्हणजे एकूण साडेचार लाख रुपये दिल्याचे प्रतिज्ञापत्रच तहसीलदार लैला शेख यांना दिले आहे. 

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून 14 जुलै रोजी वाळूचे चार ट्रक पळविण्याच्या प्रकरणात ट्‌विस्ट निर्माण झाले. यातील तीन ट्रक सोडण्यासाठी नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांना प्रतिट्रक दीड लाख रुपये म्हणजे एकूण साडेचार लाख रुपये दिल्याचे प्रतिज्ञापत्रच तहसीलदार लैला शेख यांना दिले आहे. 

दरम्यान, या प्रकरणी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख काहीच बोलायला तयार नाहीत. या प्रकरणाची गुंतागुंत वाढत असून महसूल विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

तळेगाव ढमढेरे येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून चार ट्रक 14 जुलै रोजी पळवून नेण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती होऊनही गुन्हा दाखल होण्यास 17 जुलै उजाडला. फौजदार राजेश माळी यांनी चारपैकी तीन ट्रक आणि चालक मालक मिळून सहा जणांना दोन दिवसांत अटक केली. शिरूर न्यायालयाने त्यांची जामिनीवर मुक्तता केली. 

या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. कारण, यातील मूळ गाडी मालक प्रवीण जयवंत घावटे, संजय रामदास कुरंदळे (रा. दोघेही अण्णापूर, ता. शिरूर) तसेच मच्छींद्र पोपट ओझरकर (रा. अरणगाव, ता. शिरूर) या तिघांनी मंगळवारी (ता. 4 ऑगस्ट) एका प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदार लैला शेख यांना कळविले आहे की, तीन ट्रकसाठी दंड म्हणून नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांनी 12 जुलै रोजी साडेचार लाख रुपये (प्रतिट्रक दीड लाख रुपये) आमच्याकडून घेतले आहेत. त्याची कोणतीही पावती दिलेली नाही. त्यामुळेच गोदामाचे सुरक्षा रक्षक डाळींबकर यांनी गाड्या सोडल्या. या रकमेच्या पावत्या वट्टे देत नसल्याने त्यांनी साडेचार लाखांचा अपहार केल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

या प्रकरणाशी संबंधित नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांच्याशी संपर्क साधण्याच प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल तब्बल एक तास सतत एंगेज येत होता. त्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही. 

वट्टे, डाळींबकरांना नोटीस 

दरम्यान, ता. 28 जुलै रोजी चारपैकी एक ट्रक आपल्याला न कळविता सोडल्याबाबत आपण एक नोटीस वट्टे यांना पाठविली आहे, त्याचे उत्तर अद्यापही त्यांनी दिले नाही. आता तीन ट्रकबाबत ट्रकमालकांनी जे गंभीर पद्धतीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्याबाबत नायब तहसीलदार वट्टे व सुरक्षारक्षक डाळींबकर यांना खुलासा करण्याची नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. 

पुन्हा चौकशी करणार : फौजदार माळी 

वाळूच्या ट्रकबाबत मी स्वत: तपास केला आहे. त्याबाबतचा गुन्हे दाखल करुन संबंधितांना अटक करून न्यायालयातही हजर केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून या तिघांनी तपासात किंवा न्यायालयापुढे असा कोणताही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यामुळे मी आचंबित झालो आहे. या प्रकरणाचा तपास माझ्यासाठी आव्हान असून वरिष्ठांना कळवून त्या तिघांनाही तात्काळ बोलावून घेतल्याची माहिती तपास अधिकारी राजेश माळी यांनी दिली. 

या प्रकरणातील तिसरी... 

"जे न ललाटी, ते लिही तलाठी..' अशी एक जुनी म्हण आहे. तसाच हा काहींसा प्रकार आहे. या प्रकरणात शिरुरच्या एका वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याला प्रत्येक ट्रकसाठी एक लाख 40 हजार या प्रमाणे पैसे दिल्याचे आपण साक्षीदार आहोत, असे एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या प्रकरणात शिरूरमध्ये पूर्वी तहसीलदार राहिलेल्या एकाचा नातेवाइक मध्यस्थी असून तो "पोटा'साठी हे करत असून त्याबाबत कुणीच उघडपणे बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख