रेल्वेसारखा प्रकल्प वर्षभराच्या पाठपुराव्यात मंजूर होत नसतो 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा विषय लोकसभेत किमान 15 ते 20 वेळा लावून धरला. रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, कार्यकारी संचालक, एमआरआयडीएलचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांसमवेत किमान 20-25 बैठका घेतल्या. विरोधकांनी मात्र ही रेल्वे अस्तित्वात येऊ शकत नाही असे सांगत, या प्रकल्पाला कायम विरोध करत खिल्ली उडविण्याची भूमिका चोखपणे पार पाडली. तरी मी प्रयत्न करणे सोडले नाही.
रेल्वेसारखा प्रकल्प वर्षभराच्या पाठपुराव्यात मंजूर होत नसतो 
Former MP Shivajirao Adhalrao Patil criticizes the opposition

राजगुरुनगर : पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा विषय लोकसभेत किमान 15 ते 20 वेळा लावून धरला. रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, कार्यकारी संचालक, एमआरआयडीएलचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांसमवेत किमान 20-25 बैठका घेतल्या. विरोधकांनी मात्र ही रेल्वे अस्तित्वात येऊ शकत नाही असे सांगत, या प्रकल्पाला कायम विरोध करत खिल्ली उडविण्याची भूमिका चोखपणे पार पाडली. तरी मी प्रयत्न करणे सोडले नाही. 

वास्तविक पुणे-नाशिक रेल्वे या सारखे मोठे प्रकल्प उभे राहण्यासाठी 20-25 वर्षांचा कालावधी कमी पडू शकतो. त्यामुळे सहा महिने, वर्षभरात तोंडदेखला पाठपुरावा करून कुणी असे प्रकल्प मंजूर करून आणू शकत नाही, हे इथल्या जनतेला चांगले ठाऊक आहे, असा टोला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोधकांना लगावला. 

आढळराव पाटील म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वेच्या डीपीआरला रेल्वे बोर्डाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्राप्रमाणे, राज्याने 20 टक्के निधीचा वाटा उचलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी मला सांगितले. त्यानुसार ठाकरे यांच्याशी बोललो असता त्यांनी या प्रकल्पात राज्य सरकारचा निधीचा वाटा उचलण्याची तयारी असल्याचे सांगितले.' 

"माझ्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2016 च्या रेल्वे अर्थसंकल्पात 2425 कोटींच्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या रेल्वे प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी 40 कोटींच्या प्राथमिक निधीची तरतूद करुन घेतली. महारेलच्या जुलै-2018 मध्ये झालेल्या बैठकीत रेल्वेचे चीफ इंजिनिअर राजीव मिश्रा यांनी या प्रकल्पाचे सादरीकरण कले. त्यावेळी या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण करून डीपीआर बनविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री पियुष गोयल यांना भेटून या प्रकल्पाचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी या रेल्वेचा "पिंकबुक'मध्ये समावेश केला आणि मला देशातील पहिली अत्याधुनिक सेमी हायस्पीड रेल्वे मंजूर करून घेण्याचे भाग्य लाभले,' असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. 

रेल्वे बोर्डाने अंतिम मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी, राज्य सरकार मंजुरी देणार आणि सुमारे 3208 कोटी रुपये निधीचा वाटा उचलून प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिली. या निर्णयामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून मनाशी बाळगलेले पुणे-नाशिक रेल्वेचे स्वप्ने लवकरच साकार होणार असल्याबद्दल समाधानाची भावना आहे. 
-शिवाजीराव आढळराव पाटील, 
शिवसेना उपनेते तथा माजी खासदार 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in