दिलासादायक : पुण्यात प्रथमच कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक 

पुण्यात गेल्या काही दिवसांत वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. 22) लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज लागण झालेल्या रूग्णांची संख्या 212 इतकी आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्या 212 रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 255 झाली आहे.
दिलासादायक : पुण्यात प्रथमच कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक 
First time in Pune, more people have recovered than new corona patients

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत वाढत चाललेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. 22) लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज लागण झालेल्या रूग्णांची संख्या 212 इतकी आहे. विशेष म्हणजे लागण झालेल्या 212 रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 255 झाली आहे.

गेल्या काही दिवसात लागण झालेल्या रूग्णांपेक्षा उपचार घेऊन बरे झालेल्या रूग्णांची संख्या पहिल्यांदाच अधिक आहे. मात्र, आज दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात नऊ मार्चपासून लागण झालेल्या रूग्णांची एकुण संख्या 12 हजार 686 इतकी आहे. या रूग्णांमधून सात हजार 672 रूग्ण उपचार घेऊन घरी घेले आहेत. त्यामुळे आज पुण्यात ऍक्‍टीव रूग्णांची संख्या चार हजार 496 इतकी आहे. 280 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू असून 55 जणांना व्हेंटिलेटरची भरज भासली आहे. एकुण 518 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात तीन हजार 227 रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. आज (ता. 22) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

लॉकडाऊन असले तरी पुणेकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात कुचराई होत असल्याने गेल्या काही दिवसात रूग्णांची संख्या वाढत आहे. महापालिकेच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. मात्र, शहराच्या वेगवेगळ्या भागात रूग्ण सापडत आहेत. परिणामी महापालिकेला संबंधित भाग पूर्णपणे बंद करावा लागत आहे. या साऱ्यासाठी महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. 

कोरोनाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या यंत्रणेवर सोपविण्यात आली असली तरी नागरीकांच्या सहकार्याशिवाय महापालिकेच्या यंत्रणेला ही लढाई लढणे शक्‍य नाही. मात्र, नागरीकांकडून पुरसे गांभीर्य पाळले जात नाही. 30 जूननंतर लॉकडाऊन पूर्णपर्ण उठवले जाण्याची शक्‍यता आहे. लॉकडाऊन असताना ही परिस्थिती असेल तर लॉकडाऊन उठवल्यानंतर पुण्यात काय परिस्थिती होईल याचा विचार करण्याची गरज आहे. 

हॉटेल, सलूनची दुकाने, मंदीर, मॉल यासारखी गर्दीची ठिकाणे अद्याप बंद आहेत. एक जुलैपासून ही सर्व ठिकाणे सुरू झाली तर गर्दीला आळा कसा घालणार हा प्रश्‍न आहे. योग्य सामाजिक अंतर राखून व्यवहार सुरू ठेवल्यास कोरोनापासून बचाव करणे शक्‍य आहे. मात्र, नेमकी याचीच जाणीव नागरिकांकडून ठेवली जात नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in