राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; सुरक्षित असल्याचा निर्वाळा - firing on NCP MLA Anna Bansode in Chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; सुरक्षित असल्याचा निर्वाळा

उत्तम कुटे
बुधवार, 12 मे 2021

पोलिसांचा तपास सुरू... 

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा दादू बनसोडे (MLA  Anna Bansode) यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते थोडक्यात बचावले आहे. दुपार एक वाजता ही घटना घडली. चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ हा गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या  तानाजी पवार याला पोलिसांनी घेतले ताब्यात आहे. या घटनेचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस त्यामागची कारणे शोधत आहे. (Firing on MLA  Anna Bansode)

वाच हे पण : फडणवीस यांच्या घरी भांडी घासणारे परमबीरसिंग उद्धव यांचे असे झाले लाडके

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारावरच गोळीबार झाल्याने तो शहरात चर्चेचा विषय ठरला. चिंचवड स्टेशन येथेच बनसोडे यांचे कार्य़ालय आहे. (PCMC Police) नगरसेवक असल्यापासून ते सकाळी लोकांना भेटत असल्याचा त्यांचा उपक्रम आहे. त्यांच्या कार्यालयाजवळच या गोळ्या झाडण्यात आल्या. एकूण चार गोळ्या झाडल्याचे समजते आहे. त्या कोणालाही लागलेल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. हा पवार स्थानिक नागरिकच असल्याचे समजते आहे. घटना घडल्यानंतर अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पवार व बनसोडे यांचे नक्की काय संबंध होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बनसोडे यांचे अनेक व्यावसायिकांशी संबंध आहेत. ते पण पोलिस तपासून पाहत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख