लंडनहून थेट हांडेवाडीत आला अन्‌ गुन्हा करून बसला! 
Filed a crime against a person who refused to be quarantined

लंडनहून थेट हांडेवाडीत आला अन्‌ गुन्हा करून बसला! 

राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. असे असूनसुद्धा अश्विन कुमार सिंग (वय 31) हे 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले. त्यानंतर ते तेथून हांडेवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले होते.

पुणे : राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. असे असूनसुद्धा अश्विन कुमार सिंग (वय 31) हे 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले. त्यानंतर ते तेथून हांडेवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले होते. 

त्या वेळी कार्यरत असलेले पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाइन होण्यास शेवटपर्यंत नकार देत राहिले.

जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड-19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी सांगितले आहे. 

अठरा जणांच्या निगेटिव्ह अहवालाने भोरला दिलासा 

भोर : भोर शहरातील अठरा जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे भोरमधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

भोर शहरात बुधवारी (ता. 17) दोन कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण आढळले होते. या दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अठरा जणांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे भोरमधील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. 

भोरमध्ये बुधवारी एक महिला व एका तरुणास कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील अठरा जणांना संस्थात्मक क्वारंटाइन केले होते. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल 
शुक्रवारी (ता. 19) दुपारी निगेटिव्ह आला आहे, असे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रशासनाने शहराच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. औषधे व वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली आहेत. शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरीही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टन्सिंगचे आणि सॅनिटायझर व मास्कचा वापर करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in