पन्नास कोटींच्या खंडणीसाठी दाखल केले बलात्काराचे खोटे गुन्हे 

संशयित आरोपींमध्ये तीन वकिल आणि पाच महिला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
False charges of rape were filed for a ransom of Rs 50 crore
False charges of rape were filed for a ransom of Rs 50 crore

पिंपरी : पुण्यातील लोहगाव विमानतळ रस्त्यावरील चारशे कोटी रुपयांच्या जमिनीत हिस्सा द्यावा, नाहीतर पन्नास कोटी रुपयांची खंडणी द्यावी, या मागणीसाठी जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला धमकाविणाऱ्या तीन वकिलांसह आठ जणांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिसांनी नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींमध्ये तीन वकिल आणि पाच महिला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

संशयित आरोपींमध्ये ऍड सागर मारुती सूर्यवंशी (वय 42, रा. पिंपरी चिंचवड), अश्रफ मेहबूब खान ऊर्फ अश्रफ मर्चंट (वय 45, रा. कोंढवा, पुणे), फरवाज कलजी (वय 30, रा. मुंबई) यांचा समावेश आहे. याशिवाय दोन महिला वकिलांसह एकूण पाच महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी मनीष मिलानी (वय 41, रा. मुंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ऍड. सागर सूर्यवंशी हा या प्रकरणाचा मूख्य सूत्रधार आहे. याच महिन्यात पिंपरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या 19 कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातही तो आरोपी क्रमांक एक आहे. त्याशिवाय पुण्यात शिवाजीनगर पोलिस ठाण्यातही फसवणुकीचा आणि लष्कर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलानी यांचा कुटुंब व भागीदारीत गजानन डेव्हलपर्स या नावाने जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सागर हा त्यांचा कायदेशीर सल्लागार होता. त्यामुळे मिलानींच्या सर्व व्यवहारांची त्याला माहिती होती. त्यातूनच लोहगाव विमानतळ रस्त्यावरील विमाननगर येथील अंदाजे चारशे कोटी रुपयांची 69 एकर जमीन खोट्या कागदपत्रांद्वारे बनावट सह्या करून सागरने त्याच्या नात्यातील महिलेच्या नावाने केली होती. त्याबाबतची माहिती मिळताच मिलानींनी पोलिसांत धाव घेतली. 

त्यानंतर सागर याने या जागेचे कॅन्सल डीड केले. पण, बघून घेईन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यामुळे त्याने या गुन्ह्यातील आपल्या ओळखीच्या आरोपी महिलांना पुढे करून पन्नास कोटी रुपयांची खंडणी वा चारशे कोटींच्या जागेत हिस्सा मिळण्याकरिता मिलानीविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे भिवंडी, पालघर आणि वाई येथे गेल्या वर्षी दाखल केले. ते मागे घ्यायचे असतील, तर पन्नास कोटी रुपये दे अथवा 69 एकर जमिनीत हिस्सा दे, असे सागर सतत धमकावत राहिल्याने मिलानींनी अखेर पोलिसांत धाव घेतली. 

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे तपासाधिकारी राहुल साळी यांनी "सरकारनामा'ला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com