मिळकत कर भरण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ : महापौर मोहोळ 

मिळकत कर भरण्यासाठी आज (ता. 31 मे) शेवटचा दिवस होता. पण, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 Extension till June 30 for payment of income tax: Mayor Mohol
Extension till June 30 for payment of income tax: Mayor Mohol

पुणे ः मिळकत कर भरण्यासाठी आज (ता. 31 मे) शेवटचा दिवस होता. पण, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी ही मुदत 30 जूनपर्यंत वाढण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 

या संदर्भातील आदेश महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. यासाठी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मान्यता देण्यात येईल, असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे. 

मिळकत कर भरण्यास एक महिन्याचा कालावधी मिळाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्‍य झाले नव्हते. शिवाय शनिवारी ऑनलाईन भरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महापौर मोहोळ म्हणाले, "लॉकडाउनच्या काळात काही पुणेकरांना मिळकत कर भरणे शक्‍य झाले नाही. या संकटाच्या काळात पुणेकरांना दिलासा मिळावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत पुणेकरांनी 300 कोटींच्या आसपास कर भरला आहे. गेल्या वर्षी कर भरणा करण्याकरिता 31 मेपर्यंतची मुदत होती. गेल्या वर्षी 31 मेपर्यंत 650 कोटींचा कर जमा झाला होता. आता या मुदतवाढीने कर भरणा वाढण्यास मदत मिळेल. त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर होईल. या निर्णयासंदर्भात महापालिका पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांशीही चर्चा झाली आहे' 

पुणे महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षापासून

पुणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारने आज मंजुरी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ स्थायीचे समितीचे अध्यक्ष असताना दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या अर्थसंकल्पात महाविद्यालय सुरू करण्याची कल्पना मांडून त्यासाठी अर्थिक तरतूद करण्यात आली होती.

हे महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १० एकर जागा राखीव करण्यात आली आहे. महापौर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री-पालकमंत्री अजित पवार तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांच्याकडे व्यक्तिशः पाठपुरावा केला होता. महाविद्यालय राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात यावे, असा सरकारचा प्रस्ताव होता. मात्र, महापौर मोहोळ यांनी महापालिका खर्च उचलण्यास सक्षम असल्याचे सांगून महापालिकेच्यावतीने ट्रस्ट स्थापन करून महाविद्यालय सुरू करण्याचासुरवातीपासून आग्रह धरला होता.

या संदर्भात महापौर मोहोळ म्हणाले, 'सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत अहमदाबाद महापालिकेने साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. या संदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करत वेगाने पाठपुरावा केला. आणखी काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढील वर्षीच्या जूनमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच ५०० खाटा असणारे सुसज्ज आणि अद्ययावत महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे.

५९५ पदांची निर्मिती आणि ६२२ कोटींची गरज

महाविद्यालय सुरू करण्यासाठी ५९५ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. येत्या सहा वर्षात टप्प्याटप्प्यात ६२२ कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com