कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सलूनवाल्याने केली 50 जणांची दाढी-कटिंग 

सावरगाव (ता. जुन्नर) येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबातील चौघांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे. या सर्वांच्या घशातील द्रावाचे नमुने लेण्याद्री येथे घेण्यात आले असून पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सलूनवाल्याने केली 50 जणांची दाढी-कटिंग 
Eleven people from Savargaon came in contact with Corona patient

जुन्नर : सावरगाव (ता. जुन्नर) येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबातील चौघांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे. या सर्वांच्या घशातील द्रावाचे नमुने लेण्याद्री येथे घेण्यात आले असून पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आज सांयकाळपर्यत प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित रुग्णाच्या सावरगाव येथील घरातील आठ जण, तसेच एक नातेवाईक यांच्यासह सलूनवाला, आचारी व मित्राचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. संबंधित सलूनवाल्याने नंतर पन्नासहून अधिक लोकांची दाढी कटींग केली असल्याची चर्चा आहे. 

मुंबईहून हे चौघेजण 19 मे रोजी आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी वडील व मुलीस सर्दी, खोकला, ताप येऊ लागल्याने खासगी व नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी तपासणी करण्यात आली. नारायणगाव येथील रुग्णालयात एक्‍स रे काढण्यात आला. त्यांच्या स्वॅब तपासणीनंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणारे डॉक्‍टर व अन्य कर्मचारी यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. 

मुंबईहून आल्यानंतर घरी न बसता इकडे तिकडे मुक्त फिरण्यामुळे आज गावास त्रास सोसावा लागत असल्याने मुंबईकरांनो, तुम्ही या पण घरातच थांबा! असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. 

मुंबईकरांच्या आगमनामुळे जुन्नरमध्ये धोका 

जुन्नर : मुंबईहून आलेल्या कुटुंबामुळे जुन्नर तालुका कोरोनाग्रस्त झाला असून एकूण सहा रुग्ण बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यात धोलवड येथील तीन, सावरगावचे दोन व मांजरवाडी येथील एक रुग्ण अशा एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

वाढत्या कोरोनाच्या भीतीने मुंबईहून गावाकडे येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. सोमवारअखेर (ता. 25) तालुक्‍यात 13 हजार 681 जणांना होम क्वारंटाइन, तर 792 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

लेण्याद्री येथील कोविड केंद्रात रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत 18 जणांचे नमुने घेऊन तपासनीस पाठविण्यात आले. त्यापैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

धोलवड, सावरगाव व मांजरवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून येथे प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले, याचा शोध घेण्यात येत असून त्यांची कोरोना तपासणी करून घेण्यात येणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in